Home मनोरंजन ‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत सादर करत आहे पवित्र अष्टविनायक कथा

‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत सादर करत आहे पवित्र अष्टविनायक कथा

15 second read
0
0
34

no images were found

‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत सादर करत आहे पवित्र अष्टविनायक कथा

गणेश कथा पिढ्यान् पिढ्या मौखिक परांपरेतून जिवंत राहिल्या आहेत. आजी-आजोबा खूप भक्तीने, सोप्या शब्दांत आणि प्रेमळ स्वरात या कथा आपल्या नातवंडांना सांगत असतात. भारतातील एक प्रसिद्ध मनोरंजन वाहिनी सोनी सब ही परंपरा पुढे नेत आजच्या पिढीला गणेश कथा सांगत आहे. ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ या मालिकेत आता पुढील टप्प्यावर अष्टविनायक रूपांच्या कथा तितक्याच भक्तिभावाने आणि पवित्र भावनेने सादर होणार आहेत.

प्रोमो येथे बघा:      https://www.instagram.com/reel/DSU-8zBDee_/?igsh=MWpwdnMzcmVnZWQzNA==

अर्थपूर्ण, मूल्य-आधारित कथा सादर करण्याच्या या वाहिनीच्या वचनबद्धतेस अनुसरून गणेशाच्या अष्टविनायक रूपांमधील प्रत्येक रूपाचा या मालिकेत सिनेमॅटिक शोध घेतला आहे. गणेशाच्या प्रत्येक अवताराची वेगळी कथा आहे. त्यातून वेगळा बोध मिळतो आणि त्याचा वेगळा इतिहासही आहे. प्रेक्षकांनी या सांस्कृतिक ऐश्वर्याचा आणि प्रत्येक अवतारामागील आध्यात्मिक लक्षणीयतेचा अनुभव अवश्य घ्यावा. भक्ती, कथाकथन आणि व्हिज्युअल भव्यता यांची सुंदर सांगड घालणारा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांना एक अशा विश्वात घेऊन जाईल जेथे गणेश प्रथम-पूज्य म्हणून नावारूपाला येईल आणि अदृश्य विघ्ने आणि ब्रह्मांडातील अस्थिरतेचा सामना करेल.

      सोनी सबची ओळख बनलेल्या मूल्यांशी – आपलेपणा, सकारात्मकता आणि कुटुंब-केंद्रित कथा- इमान ठेवून ‘गणेश कार्तिकेय’ सह परंपरा आणि मूल्यांचा हा नवा प्रवास आता सोनी सबवर सुरू होणार आहे आणि एक एक करून अष्टविनायकाच्या आठ रूपांची कथा उलगडत जाणार आहे.

      सोनी सबचे बिझनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले, “सोनी सबमध्ये आम्हाला असे वाटते की, श्रद्धेची कहाणी त्याच पावित्र्याने आणि प्रेमाने सांगितली गेली पाहिजे ज्या प्रेमाने ती आजवर एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगण्यात आली आहे. अत्यंत श्रद्धेने आम्ही ही गणेश कथा सादर करत आहोत आणि गणेशाच्या लीला आणि दंतकथा यांना भावनिक आणि सांस्कृतिक सत्याची जोड देणार आहोत. अष्टविनायक अवतारांच्या या कथा बघण्यासाठी कुटुंबांनी एकत्र यावे, आपल्या वारशाचा नव्याने शोध घ्यावा व मूल्यांवर आधारित नवीन परंपरा सुरू कराव्यात असे आम्हाला वाटते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव कोल्हापूर,(प्…