no images were found
भारतात २०२६ मध्ये नवीन गाड्यांच्या आगमनाची निसानकडून घोषणा, ७ सीटर बी-एमपीव्ही ग्रॅव्हाइट येणार
गुरूग्राम,: निसानची नवीन गेम-चेंजिंग सात-सीटर बी-एमपीव्ही ग्रॅव्हाइट या नावाने २०२६ च्या सुरुवातीला बाजारात उपलब्ध होईल. ब्रँडच्या भारतासाठी नवीन आणि धोरणात्मकरित्या तयार केलेल्या उत्पादन श्रेणीअंतर्गत आणले जाणारे हे पहिलेच उत्पादन आहे.आधुनिक भारतीय कुटुंबांसाठी उद्देशाने बनवलेली ग्रॅव्हाइट अपवादात्मक अद्वितीय प्रतिभा आणि बदल करता येण्याची क्षमता देते. ती किमतीबाबत जागरूक कुटुंबांसाठी सोयीची नव्याने व्याख्या करते आणि निसानच्या पुनरुज्जीवित उत्पादन पोर्टफोलिओच्या विस्ताराला गती देते.
जुलै २०२४ मध्ये निसान मोटर इंडियाच्या महत्त्वाकांक्षी उत्पादन मोहिमेतील दुसरे मॉडेल म्हणून घोषित केलेली ग्रॅव्हाइट कंपनीचा पुढील वेग अधोरेखित करते. उत्पादनाच्या पुढील क्षेणीत २०२६ च्या सुरुवातीला ग्रॅव्हाइट बाजारात उपलब्ध होईल; त्यानंतर २०२६ च्या मध्यावर टेक्टॉन आणि २०२७ च्या सुरुवातीला ७-सीटर सी-एसयूव्ही आणण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यातून भारतीय ग्राहकांसाठी आपल्या ऑफरमध्ये वैविध्यपूर्णता आणणे, त्या बळकट करून पुनरुज्जीवित करण्यासाठी निसानच्या खोल आणि सतत वचनबद्धतेची खात्री दिली जाईल.
निसान एएमआयईओ (आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, युरोप आणि ओशनिया) चे अध्यक्ष मॅसिमिलियानो मेसिना म्हणाले की: “भारताने कायमच एएमआयईओच्या कामगिरीत एक उत्तम योगदान दिले आहे आणि निसान मोटर इंडिया आमच्या धोरणात महत्त्वाची भूमिका बजावते. आर्थिक वर्ष २५ मध्ये आम्ही आमचे व्यवसायिक कामकाज मजबूत केले आहेत, आमची उत्पादनश्रेणी वाढवली आहे आणि आमच्या २०२४ च्या उत्पादन मोहिमेअंतर्गत दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केले आहे. जागतिक ज्ञानातून साकारलेली आणि भारतीय ग्राहकांच्या गरजांशी जुळणारी आगामी उत्पादन श्रेणी या गतिमान बाजारपेठेतील आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. भारतात आणि भारतासाठी विकसित होणारी नवीन मॉडेल्स आणि अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यातीमुळे भारत निसान सहयोगासाठी वाढीचा प्रेरक आणि धोरणात्मक केंद्र दोन्ही ठरला आहे. ग्रॅव्हाइटचे उद्घाटन आमची सातत्यपूर्ण गती दर्शवते आणि पुढील वाटचालीवरील आमचा विश्वास मजबूत करते.”
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले: “ऑल-न्यू ग्रॅव्हाइट हा निसान मोटर इंडियाच्या विकसित होत असलेल्या भारतीय बाजारपेठेवर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचा पुरावा आहे. देशाच्या रचनेत खोलवर रुजलेली ही गाडी आमच्या ग्राहकांच्या विविध गरजांसाठी परिपूर्ण साथीदार बनण्यासाठी डिझाइन केलेली आहे. आमच्या नवीन उत्पादन श्रेणीतील दुसरे मॉडेल म्हणून ग्रॅव्हाइट आमच्या परिवर्तनाच्या प्रवासात एक महत्त्वाचे पाऊल असून भारतीय ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करणारी वाहने देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते.”या वाढीला पाठिंबा देण्यासाठी निसान आपल्या देशव्यापी डीलरशिप नेटवर्कचा विस्तार वेगाने करत आहे. त्यामुळे देशभरात गाडी खरेदी करणे अधिक सुलभ होईल आणि ग्राहकांचा अनुभव समृद्ध होईल.
या गतीवर आधारित निसान मॅग्नाइट ब्रँड जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी ‘मेड इन इंडिया’ मॉडेलपैकी एक म्हणून ठसा उमटवत आहे. आता ही गाडी दक्षिण आशिया, मध्य पूर्व, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील ६५ बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाते. मॅग्नाइटला लोकांनी पसंती दाखवल्यामुळे निसानसाठी उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित झाली आहे.भारतात भविष्यासाठी तयार असलेल्या उत्पादन साखळीला आणखी बळकटी देताना निसानने ऑक्टोबर २०२५ मध्ये टेक्टॉन या आपल्या आगामी प्रीमियम एसयूव्हीचे उद्घाटन केले. तिचे आकर्षक डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानासह, टेक्टॉन ब्रँडच्या वाढीच्या पुढील टप्प्याला चालना देते. ती आजच्या नवीन ग्रॅव्हाइटच्या उद्घाटनाला पूरक आहे आणि भारतीय बाजारपेठेसाठी तयार केलेल्या मजबूत, विविध श्रेणीतील उत्पादनांची ओळख पटवते.गाडीची वैशिष्ट्ये आणि किंमतींसह अधिक तपशील भविष्यात घोषित केले जातील.