no images were found
गोव्यात फ्रँकलिन इंडिया बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड लाँच
पणजी: फ्रँकलिन टेम्पलटन (इंडिया) ने गोव्याच्या बाजारपेठेत फ्रँकलिन इंडिया बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड (एफआयबीएएफ) नावाचा ओपन-एंडेड डायनॅमिक अॅसेट ऍलोकेशन फंड लॉन्च केला . इक्विटी आणि इक्विटी संबंधित इंस्ट्रुमेंट्समध्ये होणारे बदल आणि फिक्सड इनकम आणि मनी मार्केट इंस्ट्रुमेंट्सच्या पोर्टफोलिओमध्ये इंव्हेस्टमेंट मॅनेज करून लॉंग-टर्म कॅपिटल ॲप्रिसिएशन आणि इनकम जनरेट करण्याचा फंडाचा हेतू आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या फायद्यांबद्दल अधिकाधिक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने फंड हाऊस गोव्यात आपले वितरक नेटवर्क वाढवण्यावर काम करत आहे. गोव्यातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सध्या सुमारे रु. २१ हजार कोटी पणजी, मडगाव आणि वास्को यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये पसरले आहेत. फक्त इक्विटीमधील वाढीच्याच संधींचा लाभ घेण्यास उत्सुक नसून मार्केटमधील अस्थिरतेचा प्रभाव कमी करण्यास देखील प्रेफरन्स देणाऱ्या लोकांसाठी हे प्रॉडक्ट योग्य आहे. नवीन फंड ऑफर 16 ऑगस्ट 2022 रोजी उघडेल आणि 30 ऑगस्ट 2022 रोजी बंद होईल, या दरम्यान युनिट्स रु.10/- प्रति युनिट दराने उपलब्ध असतील. अविनाश सातवळेकर, प्रेसिडेंट, फ्रँकलिन टेम्पलटन-इंडिया, फंड लाँचविषयी बोलतांना म्हणाले, “इंव्हेस्टर्सना गोव्यात बदलत्या मार्केटमधून, सुलभ आणि कार्यक्षम पद्धतीने नेव्हिगेट करण्यास मदत करेल अशी आणखी एक वैविध्यपूर्ण इंव्हेस्टमेंट ऑफर आणण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही भारतातील ग्रोथचा नवीन चॅप्टर सुरू होयाची आतुरतेने वाट बघत आहोत आणि एफआयबीएएफ लाँच करणे हे या दिशेच्या अनेक पायऱ्यांपैकी पहिली पायरी आहे. “हा नवीन फंड, लॉंग टर्मसाठी इक्विटी आणि डेब्टमध्ये बॅलन्स्ड एक्सपोजर शोधणाऱ्या इंव्हेस्टर्ससाठी,कॅपिटल निर्मितीसह वेळोवेळी मार्केटमध्ये मिळणाऱ्या संधी देखील शोधतो. डायव्हर्सिफाइड फायद्यांव्यतिरिक्त, त्याचा फॉर्म्युला-लक्षित अप्रोच त्याच्या इन-बिल्ट ‘बाय-सेल’ पद्धतीमुळे हाव आणि भीतीच्या भावनांमुळे वर्तणुकीशी संबंधित पूर्वाग्रह दूर करण्यास मदत करतो.”