
no images were found
रोहित पवारांची खोचक टीका! “देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून…”
अकलूजमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी विश्वासघात केला, तर देव त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी फडणवीसांवर खोचक शब्दात टीका केली आहे.
“खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच सुवर्णपदक मिळेल. आज ते ज्याला ईश्वराचा आशीर्वाद म्हणत आहेत, तो ईश्वाराचा आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत”, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस तुम्ही कुणाला येडं बनवता? अस म्हणत ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.