Home सामाजिक मुरगूडच्या श्री लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचे रविवारी शेळेवाडीत शानदार उदघाटन …

मुरगूडच्या श्री लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचे रविवारी शेळेवाडीत शानदार उदघाटन …

9 second read
0
0
83

no images were found

मुरगूडच्या श्री लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचे रविवारी शेळेवाडीत शानदार उदघाटन …

 

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथिल सुवर्णमहोत्स वी व सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेली२ कोटी५२ लाख७१ हजारावर ऐतिहासिक विक्रमी निव्वळ नफा व१०० कोटींचा ठेवीचा टप्पा पार करणारी श्री लक्ष्मीनारायण नागरी-सहकारी पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचा उद्घद्याटन सोहळा शेळेवाडी ता . राधानगरी येथे रविवार सकाळी दि .२८ / ०४ / २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला . मुरगूड येथिल मुख्य शाखेसह कूर ( ता. भुदरगड ) , सरवडे ( ता. राधानगरी ) , सावर्डे बु॥ ( ता. कागल ) , व सेनापती कापशी ( ता. कागल ) , या शाखा कार्यरत आहेत . आता शेळेवाडी येथे नवीन शाखा सुरु होऊन कार्यरत राहणार आहे .
           या नवीन शाखेचे उदघाटन जेष्ठ संस्थापक संचालक मा . श्री . जवाहर शहा यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले . तर संस्थेच्या नामफलकाचे अनावरण संस्थेचे विद्यमान चेअरमन मा . श्री . किशोर पोतदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले . कार्यक्रमात मॅनेजर केबिन मा . अनंत फर्नांडिस , कॅशिअर केबिन मा . दत्तात्रय कांबळे , लॉकर्स केबिन मा . रविंद्र खराडे , संगणक प्रणाली उदघाटन पुंडलिक डाफळे तसेच ठेव पावतींचे वितरण संचालक चंद्रकांत माळवदे (सर ) , जगदिश देशपांडे साहेब, विनय पोतदार , संचालिका सौ . सुनिता शिंदे , श्रीमती भारती कामत यांच्या हस्ते करण्यात आले .
           यावेळी संस्थेचे विद्यमान चेअरमन पोतदार म्हणाले संस्थेच्या दैदित्यमान यशात सभासद , ठेवीदार , हितकांचे सहकार्य मोलाचे आहे . त्यामुळेच १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे . या सर्वांच्या विश्वासास पात्र राहून व कार्यतप्तर संचालकांच्यामुळे श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था उत्तरोत्तर गरुडझेप घेऊन प्रगतीपथावर येत आहे . असेच संस्थेविषयी प्रेम , आपुलकी , जिव्हाळा शेळेवाडी व परिसरातू भरभरून मिळेल अशी भावनां यावेळी त्यानी व्यक्त केली . संस्थेचा धावता आढावा जेष्ठ संस्थापक संचालक श्री . जवाहर शहा यानीं घेतला . यावेळी जेष्ठ संचालक पुंडलिक डाफळे , श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन किरण गवाणकर , शेळेवाडीचे सरपंच प्रविण पाटील यानीं आपल्या मनोगतात संस्थेविषयी गौरव उदगार काढले . यावेळी पहिल्याच दिवशी ५० लाख ठेवीचे संकलन झाले .

या उदघाटन प्रसंगी श्री . व्यापारी नागरी पतसंस्थेचे संचालक शशिकांत दरेकर , संदिप कांबळे , निवास कदम , कार्य लक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर ,लक्षीनारायण पतसंस्थेचे कार्यकारी संचालक नवनाथ डवरी यांच्यासह सुरेश जाधव , आकाश रेंदाळे , सभासद , ठेवीदार , कर्मचारी वर्ग , मान्यवर , हितचिंतक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वागत संचालक विनय पोतदार यानीं तर आभार अनंत फर्नांडिस यानीं मानले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत माळवदे सर यानीं केले .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…