no images were found
कोल्हापुरकरांना मिळणार अद्ययावत श्रवणक्षमता
कोल्हापूर : श्रवणयंत्र क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सिग्नियाने कोल्हापुरकरांसाठी आरोग्य क्षेत्रातील मोठी घोषणा केली. मुंबई हिअरिंग क्लिनिकसह कोल्हापुरात १५७०/ई, देसाई कॉम्प्लेक्स शॉप नंबर १, लेन नं ३, राजारामपुरी, कोल्हापूर, ४१६००८ येथे विशेष केंद्र सुरू करण्यात आल्याचे सिग्नियातर्फे जाहीर करण्यात आले.
मुंबई हिअरिंग क्लिनिकचे कोल्हापूर येथील पहिले बेस्ट साउंड सेंटरचे उद्घाटन शिवांतोस इंडिया प्रा. लि. चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक श्री अविनाश पवार, सिग्नियाचे व्यवसाय विकास प्रमुख श्री. किशलय चक्रवर्ती आणि शिवसेनाचे जिल्हा प्रमुख श्री.संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन सेंटरबाबत मुंबई हिअरिंग क्लिनिकचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत जाधव म्हणाले, ६५ किंवा त्याहून अधिक वयाच्या १/३ किंवा अधिक प्रौढांना काही प्रमाणात वयाशी संबंधित श्रवणशक्ती कमी होते. सिग्नियामधील टीमसोबत आम्ही एक संपूर्ण निदान सेटअप आणि अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र स्वस्त दरात देऊ. जे लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना पुन्हा जीवनाशी जोडण्यास मदत करेल.