no images were found
स्वतःमधील कौशल्य ओळखून विकसित करा – रविंद्र खैरे
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित व्याख्यानात लेखक व प्रेरणादायी वक्ते रविंद्र खैरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात एखाद्या क्षेत्रातील ज्ञान मिळवणे सुलभ झाले असले तरी तुमच्याकडील कौशल्य हे तुमचे वेगळेपण असेल जे तुम्हाला यशोशिखरावर घेवून जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे दूरदृश्यप्रणालीने उद्घाटन केले. त्यापैकी एनआयटीमधील १५० प्रवेश क्षमता असलेल्या दोन कोर्सेसच्या या केंद्राच्या उद्घाटनापूर्वी खैरे यांचे ‘कौशल्य विकासाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमास संचालक डाॅ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले. अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक स्कील हबचे समन्वयक प्रा. उमेश पाटील यांनी केले. प्रा. निलम कोन्नूर यांनी सूत्रसंचालन तर प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे नोडल अधिकारी विजय निकम, विभागप्रमुख, स्टाफ व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.