no images were found
श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट चे भव्य उद्घघाटन
डॉक्टर शिशिर जिरगे व डॉक्टर पद्मा रेखा जिरगे या दोघांनी सुरू केलेल्या श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट या भव्य हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 16 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. रुग्ण सेवा हे एकच ध्येय घेऊन डॉक्टर शिशिर जिरगे व डॉक्टर पद्मा रेखा जिरगे यांनी या प्रवासाची सुरुवात केली. डॉक्टर जिरगे पती-पत्नी हे दोघेही लंडनमध्ये संधी सहज उपलब्ध असताना मायदेशी परतले. भारतातील आपल्या माणसांसाठी सेवा देण्याच्या भावनेने व रुग्णांना सर्वोच्च वैद्यकीय सेवा प्रदान करता यावी या उदात्त हेतूने 1998 साली कोल्हापूर शहरात सुरू झालेल जिरगे क्लिनिक 2003 मध्ये सध्या कार्यरत असलेल्या श्रेयस हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झालं. गेली 25 वर्षे श्रेयस हॉस्पिटल सर्वोत्तम रुग्ण सेवा प्रदान करत आता 108 बेड असलेल्या श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून जागतिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुसज्ज झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करत असताना पेशंट बरोबरचे ऋणानुबंध राहतातच पण जिरगे दांपत्य त्याही पुढे जाऊन पेशंटसाठी अद्ययावत सुविधा आणि मायेची ऊब सदोदित राहील असा विचार करून श्रेयस हॉस्पिटलला एक नवे रूप देत आहेत.
25 वर्षे मूत्ररोग विभाग आणि स्त्री रोग प्रसुती व वंध्यत्व चिकित्सा यासाठी कार्यरत असलेले श्रेयस हॉस्पिटल नवीन मल्टी स्पेशालिटी स्वरूपात यूरोलॉजी ,स्त्री रोग व प्रसुती, सुश्रुत असिस्टेड कन्सेप्शन क्लिनिक अंतर्गत अत्याधुनिक आयव्हीएफ उपचार, अत्याधुनिक प्रसूती विभाग यासह नवजात शिशुविभाग, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज, जनरल सर्जरी, रेडिओलॉजी, नेफरोलॉजी, डायलिसिस युनिट, मेडिकल व सर्जिकल आयसीयु व इमर्जन्सी सर्विसेस, प्लास्टिक सर्जरी विभाग,फार्मसी ,आधुनिक पॅथॉलॉजी लॅब या सर्व विभागांसह सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सुसज्ज झाले आहे. प्रथमच खाजगी रुग्णालयात असंसर्गजन्य रोगांच्या( मधुमेह ,हृदयरोग, श्वसनसंस्थेचे आजार, कर्करोग )प्रतिबंधासाठी समर्पित क्लिनिक स्थापन केले जात आहे याचाच एक भाग म्हणून महिलांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या कर्क रोगांच्या प्रतिबंधासाठी कॉलपोस्कोपी सेवा आणि मॅमोग्राफी सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विविध वैद्यकीय सेवांसाठी रुग्णांची होणारी धावपळ बघून सर्व सेवा एकत्रित उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा विस्तार करण्यात आला आहे रुग्णांना सर्व विभागांमध्ये अत्याधुनिक व अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील. बारा मजली असणाऱ्या या इमारतीमध्ये पाच अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स उपलब्ध असणार आहेत .हॉस्पिटलची संपूर्ण इमारत रुग्णांचा पूर्णतः विचार करून त्यांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचाही विचार करत प्रशस्त व हवेशीर अशी तयार करण्यात आली आहे . आपल्या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य असलेला पाचव्या मजल्यावर असलेला प्रसूती विभाग हा पूर्णतः माता व व शिशु यासाठी असेल. या मजल्यावर या विभागासाठी एक स्वतंत्र ओटी व दोन लेबर रूम्स असणार आहेत, तसेच या विभागातील रुग्णांसाठी परिपूर्ण अशा रूम्स तयार करण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये प्रशस्त वेटिंग रूम असून , प्रतीक्षा कालावधीमध्ये पेशंटचे नातेवाईक इथे असणाऱ्या एक्सरसाइज रूम मध्ये व्यायाम करू शकतात. उपचाराबरोबरच व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा एक हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम आहे. मोठ्या प्रमाणात कम्प्युटर वर्क स्टेशन्स देखील उपलब्ध केले आहेत, ज्यायोगे हॉस्पिटलमध्ये येणारे आयटी वर्कर्स त्यांचे काम करू शकतील. आयसीयु पेशंटसच्या नातेवाईकांसाठी देखील आरामदायी प्रशस्त असा एक विभाग हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आला आहे, जेथे पेशंटचे रिलेटिव्ह विश्राम करू शकतील.हॉस्पिटलच्या उत्तर बाजूला युनिव्हर्सिटी व राजाराम तलावाचे दृश्य ,पूर्वेला एअरपोर्ट ,दक्षिणेला वैभव हौसिंग सोसायटी, तर पश्चिमेला संपूर्ण शहराचे विहंगम दर्शन दिसते. हॉस्पिटलचे निसर्गरम्य वातावरण रुग्णांना नक्कीच त्यांच्या शारीरिक व्याधीचा विसर पडण्यास मदत करेल ,इतकेच नव्हे तर पिण्यासाठी चांगले पाणी उपलब्ध व्हावे म्हणून उत्तम प्रतीच्या वॉटर प्लांटची सोय करून दिली आहे . ग्रीन हॉस्पिटल या संकल्पने अंतर्गत आणि आपल्या वसुंधरा संवर्धनासाठी श्रेयस हॉस्पिटल प्लास्टिक मुक्त आहे. हॉस्पिटल अंतर्गतच सेंट्रल मॉड्युलर किचनची सुविधा देण्यात आली आहे याद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ताजे व पौष्टिक अन्न वितरित केले जाईल. महाराष्ट्र मध्ये आपण पाण्याचे महत्व आणि जैव वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न याबाबत जाणून आहोतच ,आपल्या श्रेयस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शंभर टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था आहे, तसेच जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन हॉस्पिटलने पूर्णतः पर्यावरण पूरक केले आहे.
आपले रिसर्च इन्स्टिट्यूट हे नेहमीप्रमाणे संशोधनाद्वारे नवनवीन वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कायम कार्यरत राहील.डॉक्टर शिशिर जिरगे व डॉक्टर पद्मा रेखा जिरगे यांच्या सोबत आपल्या अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स टीम मध्ये पुढील डॉक्टर कार्यरत असतील.