no images were found
आत्मनिर्भर निवेशक होण्याच्या दृष्टीने सीडीएसएल आयपीएफ ने विद्यार्थी, प्राध्यापकांना शिक्षित करण्यासाठी गुंतवणूक जागृती कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (सीडीएसएल आयपीएफ ) ने कोल्हापुरातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी गुंतवणूक जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोल्हापूरच्या डीबीआरके कॉलेजमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आर्थिक साक्षरतेला चालना देण्यावर आणि भांडवली बाजारातील गुंतवणुकीबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकदारांना सक्षम बनविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता, तसेच गुंतवणुकीच्या मुख्य तत्त्वांची माहिती देण्यात आली.
या उपक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहावेत, यासाठी हा कार्यक्रम मराठी आणि इंग्रजी भाषेत आयोजित करण्यात आला होता. वक्त्यांनी विद्यार्थींसाठी गुंतवणुकीच्या संकल्पना सोप्या करून तर सांगितल्याच, पण गुंतवणुकीची मूलभूत माहिती आणि डिपॉझिटरीजचे कार्यही समजावून सांगितले.
भांडवली बाजारातील आर्थिक समावेशन साध्य करण्यासाठी गुंतवणूकदारांचे शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. हे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील गुंतागुंत आत्मविश्वासाने नेव्हिगेट करण्यासाठी आणि #आत्मनिर्भरनिवेशक होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे हे सीडीएसएल आयपीएफ चे उद्दिष्ट आहे.आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी वचनबद्ध असलेले सीडीएसएल आयपीएफ यंदा देशभरात आणखी गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.