महत्त्वाच्या लोकांवरील हल्ल्यावरून संतापले अजित पवार मुंबई : राज्यातील महत्वाच्या लोकांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे का? अशी टीका करत अजित पवारांनी संताप व्यक्त केला. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लबोल करण्यात येत आहे. आ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. …