no images were found
महत्त्वाच्या लोकांवरील हल्ल्यावरून संतापले अजित पवार
मुंबई : राज्यातील महत्वाच्या लोकांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे का? अशी टीका करत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.
रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लबोल करण्यात येत आहे. आ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. कोकणातील एक पत्रकाराला संपवले, तो अपघात झाल्याच दाखवलं. यामागे कोण आहे, कोण मास्टरमाईंड आहे हे कळलं पाहिजे. पोलीस झोपा काढतायत का? सर्वसामान्यांनी कुणाकडे बघावं? कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात यावर आम्ही आवाज उठवणार असल्याच अजित पवार म्हणाले.
महत्तवाच्या लोकांच्याबाबत अशा घटना घडायला लागल्या, तर सर्वसामान्य माणासांनी कुणाकडे बघावं? कायदा, सुव्यवस्था कशी या राज्यात राहणार? या घटनेचा तपास झालाच पाहिजे यासाठी अर्थसंकल्प अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोरी करण्यामागचा सूत्रधार कोणी तिसराच दिसतोय, मतांचे विभाजन करण्यासाठी हे केल्याचं दिसतंय. याचा फायदा इतर पक्षांना व्हावा यासाठी कोणीतरी हे केलं असावं. पण कोणी जर हे केलं असेल तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारांना आवाहन करतील की, नाना काटे हे महाविकास आघाडीचा उमेदवार आहेत आणि त्यांनाच मतदान करावं असं ते सांगतील.
संजय राऊत यांच्याकडे काय माहिती आहे हे मला माहित नाही. पण कुणाला कोणी धमकावत असेल आणि सातत्याने अशा घटना घडतायत तर हे सरकारचे अपयश आहे. महाविकास आघाडीला कोणती अडचण येईल असं वक्तव्य मी करणार नाही असे देखील अजित पवार म्हणाले.