no images were found
सीपीआर रुग्णालयास इंडोकाउंट फाउंडेशनकडून साहित्य प्रदान
कोल्हापूर : राजर्षी छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येथे इंडोकाउंट फाउंडेशन गोकुळ शिरगाव एमआयडीसी कोल्हापूर यांच्याकडून शल्य चिकित्सक विभाग अंतर्गत युरोलॉजी विभागाकरिता अत्याधुनिक साहित्य प्रदान करण्यात आले.सर्व साहित्यांचे हस्तांतरण आणि लोकार्पण सोहळा नुकताच सीपीआर हॉस्पिटलमध्ये पार पडला.
सीपीआर हॉस्पिटल मधील युरोलॉजी विभागासाठी ऑलिंपसेस पीसीएनएल, मिनी नेप्रोस्कोप यासह टाटा स्वच्छ प्युरिफायर सिस्टीम इत्यादी साहित्य देण्यात आले. तसेच कुंभी इमारत सुशोभीकरण सीएसआर अंतर्गत 50 लक्ष रुपये खर्चून केलेल्या कामाचाही लोकार्पण सोहळा घेण्यात आला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली व देणगी समितीचे डॉक्टर अजित लोकरे, डॉ. गायत्री एस. एस. गर्ग डॉ. डी,पी, गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी इंडोकाउंट फाउंडेशन गोकुळ शिरगाव एमआयडीसी यांचे डॉ. सुरेंद्र गर्ग, सीनियर कर्डीओलॉजिस्ट, कमल मित्रा, डायरेक्ट इंडस्ट्रीज, डी.पी. गर्ग इंडोकाउंट कंपनी, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे डॉ. प्रिया कुंभार प्राध्यापक व विभागप्रमुख, शल्य चिकित्सक डॉ. राहुल गुणे, डॉ. राजीव कोरे, डॉक्टर शिशिर झिरगे, शशिकांत राऊळ, महेंद्र चव्हाण, बाजीराव आपटे, समाजसेवा अधीक्षक, नर्सिंग स्टाफ, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.