no images were found
_पेठवडगाव येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष_
*पेठवडगाव – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 22 जानेवारी 2023 या दिवशी वडगाव विद्यालय वडगाव ज्युनिअर कॉलेज येथे सायंकाळी 6 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रचारासाठी 20 जानेवारीला शहरात वाहनफेरी काढण्यात आली. या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फेरीत असणारे भगवे ध्वज, धर्माभिमानी हिंदूंनी परिधान केले भगवे फेटे, फेरीत देण्यात आलेल्या हिंदुत्व जागृत करणार्या घोषणा यांमुळे अवघे पेठवडगाव भगवेमय झाले होते. या वेळी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, भारत मातेचा विजय असो, हिंदु एकजुटीचा विजय असो, हिंदूंनो जागे व्हा, वंदे मातरम् यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. भगवे ध्वज आणि उत्स्फूर्त जयघोष यांमुळे संपूर्ण वातावरणात शौर्य आणि चैतन्य स्फुरल्याचे दिसून आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. राजेंद्र जाधव आणि त्यांच्या पत्नी यांनी हिंदु धर्माचे प्रतीक असणार्या धर्मध्वजाचे पूजन केले. पूजनाचे पौरोहित्य श्री. गिरीष देशपांडे यांनी केले. यानंतर वाठार नाका, साळी गल्ली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, विद्या कॉलनी, वारणा बझार, वडगाव हायस्कूल, बिरदेव चौक, सुतार गल्ली, शिवतीर्थमार्गे महापालिका चौक येथे फेरीचा समारोप झाला. फेरीच्या मार्गात ठिकठिकाणी फेरीचे स्वागत करण्यात आले. फेरीच्या समारोपप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. धनंजय गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधाकर पिसे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी बजरंग दलाचे श्री. किरण पुरोहित आणि श्री. किरण कोळी, शिवसेनेचे श्री. अंकुश माने आणि श्री. अनिल माने, श्री. मनोहर काटकर, श्री. वैभव हिरवे, श्री. धनाजी सलगर आणि श्री. विशाल सणगर, श्री. राजेंद्र बुरुड यांसह हिंदू धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि हिंदुत्वाचे स्फुल्लींग चेतवणार्या फेरीने पेठवडगाववासियांचे मन जिंकले