Home शासकीय बीएसनएनएल लाँच करणार 5 जी सेवा – दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव

बीएसनएनएल लाँच करणार 5 जी सेवा – दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव

4 second read
0
0
64

no images were found

बीएसनएनएल लाँच करणार 5 जी सेवा – दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव

भारतामध्ये काही शहरांमध्ये 5-जी इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने 5 जी इंटरनेट सेवा सुरू केली असून पुढील वर्षाच्या अखेरीस देशभरात 5 जी इंटरनेट लाँच करण्याची तयारी या खासगी कंपन्यांनी केली आहे.

टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या 5 जी बाबत महत्वपूर्ण माहिती देताना सांगितले की, बीएसएनएलदेखील लवकरच 5 जी इंटरनेट लाँच करणार आहे. बीएसएनएलचा अपग्रेड करण्यासाठी किमान 5 ते 7 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी ही 5 जी इंटरनेट सेवा संपूर्ण देशात लाखो टेलिकॉम टॉवरसह सुरू करण्यात येईल. बीएसएनएलच्या 4 जी तंत्रज्ञानाला 5 जीमध्ये अपग्रेड करून येत्या 5 ते 7 महिन्यात 1.35 लाख टॉवरवर रोलआउट करण्यात येणार असल्याची माहिती टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 

CII च्या कार्यक्रमाद्र्म्यान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधीत वाढ करण्यात येणार असून  हा निधी 500 कोटींहून 4000 कोटी प्रति वर्ष इतका करण्यात येणार असल्यामुळे नव्या स्टार्टअपला प्रोत्साहन मिळणार आहे. 

बीएसएनएलने व टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसला 5G चाचणीसाठी उपकरणांबाबत चर्चा केली आहे. 5G सेवा भारतातील दुर्गम भागात बीएसएनएलकडून दिली जाणार आहे. यामुळे लोकांच्या नेटवर्कशी संबंधित समस्या दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे खात्यातंर्गत 800 स्टार्टअप आणि संरक्षण खात्यातंर्गत 200 स्टार्टअप कार्यक्रम सुरू करण्यात आले असल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…