no images were found
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा! – सनातन संस्थेचे आवाहन
कोल्हापूर (प्रतिनिधी):- हिंदु धर्मातील अद्वितीय आणि श्रेष्ठ परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे; परंतु आजचे युग हे धर्मयुद्धाचे आहे. संपूर्ण पृथ्वीवर अधर्माचे सावट पसरले आहे. अशा काळात धर्माच्या बाजूने उभे राहणे, हाच साधनेचा आणि मुक्तीचाही सर्वोच्च मार्ग आहे. ही जाणीव प्रत्येकापर्यंत पोचवण्यासाठी आणि धर्म-राष्ट्रासाठी कर्तव्यनिष्ठा जागवण्यासाठी गुरुवार, १० जुलै २०२५ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात ७७ ठिकाणी, तर कोल्हापूर जिल्ह्यात २ ठिकाणी ठिकाणी होणार आहे. कोल्हापूर शहरात इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, लकी बझारच्या वर, राजारामपुरी येथे, तसेच गडहिंग्लज येथे विनायक प्लाझा, देसाई मंगल कार्यालय, चर्च रोड येथे होत आहे. याच समवेत निपाणी (कर्नाटक) येथे मराठा मंडळ, सांस्कृतिक भवन, साखरवाडी, ‘बी.एस्. एन्.एल्’ ऑफिससमोर हा महोत्सव होत आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.
सायंकाळी ५.३० वाजता होणार्या या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्याचा प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण; रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ; समाज, राष्ट्र आणि धर्म विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन; तसेच ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांचे, तसेच पुणे येथील ‘असत्यमेय जयते’, या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांचे मार्गदर्शन होणार आहे. याव्यतिरिक्त धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि राष्ट्र-धर्म विषयक फलक प्रदर्शनही महोत्सवस्थळी लावण्यात येणार आहे.
विशेष आकर्षण म्हणून काही ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तरी अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ – देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ मिळावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ व मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. १० जुलैला मराठी भाषेतील महोत्सवाचा लाभ पुढील लिंकवरून घेता येईल