no images were found
आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा
कोल्हापूर-आकाश बायजूज विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या आघाडीच्या संस्थेने आपल्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या एएनटीएचई-२०२३ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा) च्या १४व्या आवृत्तीची घोषणा केली. ही वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार मिळवण्याची संधी देते. वैद्यकशास्त्र किंवा अभियांत्रिकीमधील उज्ज्वल स्वप्ने साकारण्यासाठी तरुणांना सक्षम बनवून एएनटीएचई-२०२३ हा यशाचा मार्ग खुला असल्याचे वचन देते,अशी माहिती अमित शर्मा, असिस्टंट डायरेक्टर यांनी आकाश बायजुजच्या नवीन उपक्रमाविषयी बोलताना पत्रकार परिषदेत दिली.यावेळी श्रेयश ठाकूर,ब्रॅंच मॅनेजर,मनिष कुमार, इंजिनिअरिंग हेड,रूपाली देशपांडे, मेडीकल हेड मुख्य उपस्थित होते.
पुढे माहिती देताना श्री.शर्मा म्हणाले,ही शिष्यवृत्ती मिळवणारे आकाश संस्थेमध्ये नावनोंदणी करू शकतात आणि नीट, जेईई, राज्यपातळीवरील सीईटी, शाळा किंवा बोर्ड परीक्षा, राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शोध (एनटीएसई) आणि ऑलिम्पियाड्ससारख्या अशा विविध शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवू शकतात. या वर्षी विद्यार्थ्यांसाठी यात आणखी एक मौल्यवान भर घालण्यात आली आहे, ती म्हणजे विविध इयत्तांमधील १०० विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान मोहिमेसाठी पाच दिवसांची सशुल्क सहल जिंकण्याची संधी आहे.एएनटीएचई २०२३ बाबत माहिती देताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लि.चे (AESL) मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक माहेश्वरी म्हणाले, “स्वप्न आणि क्षमता यांच्यातील अंतर कमी करून लाखो विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एएनटीएचई हे महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. २०१०पासून याची सुरवात झाल्यापासून, आम्ही देशभरातील पात्र विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या मार्गदर्शाच्या संधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ठिकाणाचे अडथळे दूर करत आहोत. एएनटीएचई परीक्षेने विद्यार्थ्यांना ते कुठेही असले तरी नीट (NEET) आणि आयआयटी-जेईई (IIT-JEE)परीक्षांची तयारी स्वत:च्या गतीने करण्याचा मार्ग खुला केला आहे. आम्हाला एएनटीएचई २०२३ साठी उदंड प्रतिसादाची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेण्याच्या आमच्या मोहिमेमध्ये सातत्याने पुढे जात राहाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या सर्व दिवसांमध्ये सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित केली जाईल, तर ऑफलाइन परीक्षा आठ आणि १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० आणि ४ ते ५ अशा दोन शिफ्टमध्ये देशभरातील बायजूज आणि आकाश केंद्रांवर घेतली जाईल. विद्यार्थी त्यांच्या सोयीने कोणतीही एक वेळ निवडू शकतात.
या परीक्षेचे निकाल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी, इयत्ता सातवी ते नववीसाठी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी आणि अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर केले जातील. निकाल आमच्या वेबसाइटवर उपलब्ध होतील. शेवटी आभार मनिष कुमार यांनी मानले.