no images were found
ख्रिसमस तसेच नववर्षासाठी ‘विंटर स्पेशल’ रेल्वे
नागपूर : यंदाच्या नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या सुट्टीमुळे रेल्वे आरक्षणासाठी होणारी लगबग तसेच रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अधिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांकरिता ‘विंटर स्पेशल’ म्हणून 30 गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 6 डिसेंबरपासून या रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या आहेत. तर नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस 11 डिसेंबरपासून सुरू करण्यात येईल.
पुणे-अजनी साप्ताहिक स्पेशल 10 गाड्या असतील तर 01443 ही स्पेशल गाडी पुण्याहून प्रत्येक मंगळवारी 6 डिसेंबर 2022 ते 3 जानेवारी 2023 पर्यंत चालविली जाईल. दुपारी 3.15 वाजता ती पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.50.वाजता नागपुरात पोहोचेल. ट्रेन नंबर 01444 ही स्पेशल गाडी 7 डिसेंबर 2022 ते 4 जानेवारी 2023 पर्यंत प्रत्येक बुधवारी अजनी स्थानकावरून रात्री 7.50 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 11.35 वाजता पुण्यात पोहोचेल. या दोन्ही गाड्या मार्गातील दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबतील. 43 एसी 3 टायर आणि 2 जनरेटर व्हॅन अश्या स्वरूपात ही गाडी राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. त्यानंतर प्रवाशांसाठी ही ट्रेन सुरु होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन 9 आणि 10 डिसेंबरला बिलासपूर-नागपूर-बिलासपूर दरम्यान होणार आहे.