Home शासकीय सीमावादानंतर कोल्हापुरात जमावबंदी आदेश

सीमावादानंतर कोल्हापुरात जमावबंदी आदेश

3 second read
0
0
33

no images were found

सीमावादानंतर कोल्हापुरात जमावबंदी आदेश

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात कर्नाटकच्या हद्दीत कन्नड वेदिका संघटनेच्या महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष करून तोडफोड केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना लक्ष्य करणे तसेच कर्नाटकातील प्रवासी वाहने, एस. टी. बसेस यांना अडवून त्यांचे नुकसान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सीमावर्ती भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ९ ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

या आदेशानुसार ५ वा ५ हून अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणुका काढणे व सभा घेण्यास बंदी असणार आहे‌. शिवाय ग्रामपंचायत निवडणुका सुध्दा लागल्या असून आचारसंहिता सुरू आहे. अशावेळी अधिकार बजावण्यासंबंधी तसेच निवडणुकीचे कामकाज करताना आणि ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक कोल्हापूर, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण-उत्सव-जयंती-यात्रा हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना जमावबंदी आदेश लागू नाही असे पत्रकात म्हटले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…