Home Uncategorized कर्नाटकचा तिढा सुटला, अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

कर्नाटकचा तिढा सुटला, अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

2 second read
0
0
49

no images were found

कर्नाटकचा तिढा सुटला, अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

 बंगळुरू : गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती. डीके शिवकुमार की सिद्धरामैया यापैकी कोण कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार, याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या चार ते पाच दिवसाच्या सस्पेन्सनंतर अखेर कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैया यांच्या गळ्यात पडली आहे. तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. सिद्धारमैया हे काँग्रेसचे बुजुर्ग नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पूर्वीही कारभार पाहिला आहे. तसेच प्रशासनावर त्यांची प्रचंड पकड आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. नवे मुख्यमंत्री उद्याच पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सिद्धारमैया यांच्या नावाची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात केली जाणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचे मोठे श्रेय काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रे’ला दिले आहे. ‘भारत जोडो यात्रा विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या द्वंद्वात राहुल गांधींनी काढलेली पदयात्रा ‘स्पष्ट विजयी’ ठरल्याचे पक्षाने म्हटले आहे. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. कारण गेल्या वर्षभरात काँग्रेसनं हे दुसरं राज्य भाजपकडून खालसा केलाय. त्यामुळे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्नाटकचा विजय फायदेशीर ठरणार का हाच खरा प्रश्न आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…