
no images were found
पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या बोलेरो आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक,7 जणांचा जागीच मृत्यू
सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव बोलेरो गाडी आणि रॉंग साईडने येणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहे.मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. बोलेरो गाडीतील मृत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचं समोर आलें आहे. हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी- नागपुर माहमार्गावरील वडडी गावाच्या हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला.
बोलरे गाडी पंढरपूरच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बोलेरोला धडक दिली. विटाने भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला ,ज्यामध्ये भरधाव असणारी बलोरे गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. ज्यामध्ये गाडीचा चक्काचुर होऊन 7 जण जागीच ठार झाले. तर 1 तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीला तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी मिरज पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून अपघातात चूक कोणाची होती याचा तपास सुरु करण्यात आला आहे. यासाठी परिसरारातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जाणार आहे.