no images were found
सुभाष घई, माझ्या भावासारखे आहेत- शत्रुघ्न सिन्हा
या रविवारी रात्री 8:00 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल – सत्र 13 या प्रतिष्ठित गायन रियालिटी शोमध्ये स्वागत करण्यात येणार आहे, बॉलीवूडचा ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि त्याची पत्नी पूनम यांचे. हा ‘शादी स्पेशल’ भाग असणार आहे. या भागात प्रेक्षक टॉप 8 स्पर्धकांच्या सुरेल परफॉर्मन्सेसचा आनंद तर घेतीलच पण त्याच बरोबर आमंत्रित पाहुण्यांच्या गप्पा आणि किस्से ऐकून त्यांना भूतकाळाची सहलही घडेल! परफॉर्मन्सेसबद्दल सांगायचे तर, कोलकाताहून आलेली बिदीप्ता चक्रवर्ती 2001 मधील चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ मधील ‘बोले चूडियां’ हे लोकप्रिय गीत सादर करणार आहे. तिचे ते सुरेल गाणे ऐकून सेटवरील सर्व जण तिचे भरभरून कौतुक करताना दिसतील.
इतकेच नाही, गंमतीच्या मूडमध्ये परीक्षक हिमेश रेशमिया बिदीप्ताला सांगेल की,‘लड्डू शादी का तो यारों ऐसा है, जो खाए पछताए, जो ना खाए पछताए’या उक्तीवरील काही ओळी तिने आपल्या आवाजात सादर कराव्यात. बिदीप्ताने ही विनंती मान्य केल्यावर हिमेश रेशमिया त्यात स्वतःच्या काही ओळी जोडताना दिसेल आणि गाणे आणखी रंजक करेल. मग विशाल दादलानी थोडाच मागे राहणार आहे! विशाल आणि होस्ट आदित्य नारायण देखील आपल्या ओळी त्यात जोडताना दिसतील! हा सगळा प्रकार फारच रंजक असणार आहे.
बिदीप्ताचा परफॉर्मन्स ऐकून प्रभावित झालेला विशाल दादलानी म्हणाला, “तू हे गाणे जितके सुंदर गायलीस तितकेच सुंदर एक्सप्रेशन देखील तू त्याला दिलेस. तुम्हाला ही गोष्ट समजावी लागेल की, आजच्या काळात कलाकार त्यांच्या आवाजाने आणि चेहर्याने ओळखले जातात. ते आता पार्श्वभूमीत राहिलेले नाहीत. आता तुम्ही जेव्हा मंचावर जाता, तेव्हा प्रेक्षकांना बिदीप्ताला देखील बघायचे असते. मला वाटते ही गोष्ट तुला अचूक साधली आहे. त्याबद्दल तुझे अभिनंदन आणि उत्तम गायलीस!”
विशाल दादलानीशी सहमत होत शत्रुघ्न सिन्हा म्हणाला, “विशाल जे म्हणाला, त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. खूप दिवसांनी आणि नवोदित गायकांच्या बाबतीत मी हे पाहतो आहे की, जेव्हा एक स्पर्धक गातात, तेव्हा काही गोष्टी उठून दिसतात. स्थिरता, स्पष्टता असते आणि काही मुद्रा असतात, ज्या खूप शांत आणि सौम्य होत्या. या तीन गोष्टी पाहता आणि माझा अनुभव जमेस धरून मी हे सांगू शकतो, की तू खूप सुंदर सादरीकरण केलेस. हे जुने गाणे नव्या शैलीत सादर करून तू ते नवीन केलेस! देव तुझे भले करो! माझ्या मित्रांना देखील मी तुझी प्रशंसा करताना पाहिले आहे. त्यापैकी एक माझा फॅमिली फ्रेंड आहे, जो येथे अतिथी म्हणून आला होता, तो म्हणजे सुभाष घई. सुभाष घई मला माझ्या भावासारखे आहेत. ते देखील तुझे कौतुक करत होते.