
no images were found
१२ व्या वर्षी कुष्ठरोग झाला,-डिंपल
अभिनेत्री डिंपल कपाडिया त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी ओळखळल्या जातात. डिंपल यांचा पहिला सिनेमा होता बॉबी. जो सुपरडुपरहिट ठरला होता. राज कपूर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमाची एक खास आठवण आणि १२ व्या वर्षी झालेला कुष्ठरोग याची आठवण आता डिंपल कपाडिया यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. डिंपल कपाडिया किशोरवयात असताना दिग्दर्शक राज कपूर यांनी ‘बॉबी’ सिनेमातल्या बॉबी या मध्यवर्ती भूमिकेसाठी निवडलं होतं. माझ्या आयुष्यातला तो संपूर्ण कालावधी एखादी जादू वाटावी इतका सुंदर होता असं डिंपल यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी १२ व्या वर्षी कुष्ठरोग झाल्याचीही आठवण सांगितली.