Home Uncategorized मी लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच टार्गेट; -पूजा खेडकर

मी लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच टार्गेट; -पूजा खेडकर

6 second read
0
0
34

no images were found

मी लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच टार्गेट; -पूजा खेडकर

 

नवी दिल्ली : पूजा खेडकर प्रकरणी अटकपूर्व जामिनावर सुनावणी पार पडली. पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर आज संध्याकाळी 4 वाजता पटियाला हाऊस कोर्ट आदेश देणार आहे. पूजा खेडकर यांच्याकडून दिव्यांग प्रमाणपत्र कोर्टाला सादर करण्यात आलं आहे. पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा खेडकर यांच्या वकिलांनी केलं आहे. तसेच, जेव्हा जेव्हा आम्ही Puja चं नाव बदलून Pooja असं केलं. त्या-त्या वेळी आम्ही गॅझेट नोटीफिकेशन केलं होतं, असा दावा पूजा खेडकरांच्या वकीलांनी कोर्टात केला आहे. त्याचप्रमाणे, मला मिळालेलं दिव्यांग प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डानं दिलेलं आहे, त्यामध्ये फ्रॉड काय आहे? असा दावाही पूजा खेडकर यांच्या वतीनं कोर्टात करण्यात आला आहे.

पूजा खेडकर प्रकरणी अटकपूर्व जामिनावर सुनावणी पार पडली. यापूर्वी अटकपूर्व जामीन अर्जावर तात्काळ सुनावणीची मागणी पूजा खेडकरांमार्फत करण्यात आलेली. पण, कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली होती. अखेर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याप्रकरणी सुनावणी पार पडली. पूजा खेडकर यांच्या वतीनं अॅडव्होकेट बीना माधव यांनी बाजू मांडली.
पूजा खेडकर यांच्या वतीने कोर्टात कबुली देण्यात आली आहे. मी 12 ऐवजी 5 एटेम्प लिहिले आहेत, त्यामागे माझा जो उद्देश होता, या सगळ्याची चौकशी यूपीएससी करू शकेल, असं पूजा खेडकरांच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आलं आहे. म्हणजेच, पूजा खेडकर यांच्या वकिलांमार्फत सांगण्याचा प्रयत्न होत आहे की, या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी करण्याची गरज नाही, तर यूपीएससीनं करावी. दिल्ली क्राईम ब्रांचनं याप्रकरणी चौकशी करण्याची गरज नाही. कारण हे सर्व प्रकरण यूपीएससीच्या कार्यकक्षेत आहे. आतापर्यंत आम्हाला कोणतीही नोटीस आलेली नाही. तसेच, कोणत्याही स्वरुपाची माहिती लपवली आहे, असा आरोपही आमच्यात झालेला नाही. यूपीएससीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना मिळालेलं घटनात्मक संरक्षण आहे, त्यावरही पुर्नविचार करण्याची गरज आहे. तसेच, त्यांनी सांगितलं आहे की, मला यूपीएसकडून संरक्षण मिळालेलं आहे. काही विशेष अधिकारही मला आहेत. त्यामुळे मला थेट दोषी ठरवून माझ्यावर कारवाई होऊ शकत नाही. आधी मला यूपीएससीनं मला दोषी ठरवलं पाहिजे, त्यानंतर पोलीस कारवाई करू शकतात.
माहिती लपवणं आणि खोटी माहिती देणं, हा आरोप आमच्यावर लावला जाऊ शकतो
मला ऐकले गेलेले नाही
मला नोटीस मिळाली आणि दुसऱ्या दिवशी FIR झालं
त्यांना माझी कोठडीत चौकशी का करायची आहे? माझ्या कस्टोडिअल चौआकशीची गरज काय?
माझ्यावर FIR झाला आणि मीडिया आमच्या मागे लागला
मी मीडियात गेले नाही
मी कोर्टात आले कारण आम्हाला कोर्टावर विश्वास aahe
मी लैगिक छळाची तक्रार दिली म्हणून माझ्याविरोधात हे केलं जात आहे.
तुम्ही म्हणताय की, तीन अतिरिक्त Attempt देण्याची परवानगी उच्च न्यायालयानं दिली, तुम्ही एक एक करुन दाखवून द्या की, तुम्हाला कशी परवानगी दिली गेली होती?
उच्च न्यायालयाचे निकालपत्र दिव्यंगत्वावैषयी आहे : कोर्ट
तुम्ही उच्च न्यालयालकडून परवानगी मागितली होती, तसं तुमच्या याचिकेत आहे :
मी जेव्हा जेव्हा यूपीएससीची परीक्षा दिली, तेव्हा तेव्हा उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा आधार घेतला होता.

तसेच, पूजा खेडकरांच्या वकिलांनी पूजा खेडकर फायटर असल्याचं सांगितलं. दर वेळी तिला परीक्षार्थी होण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. आम्ही 5 अटेम्प्ट चांगल्या हेतूनं लिहिले होते. ती दिव्यांग आहे. तिचे आईवडील घटस्फोटीत आहेत. ती महिला आहे. तिच्यावर गुन्हा का दाखल केला गेला? कारण ती दिव्यांग आहे म्हणून? ती महिला आहे म्हणून?, असंही पूजा खेडकरांची बाजू मांडताना वकिलांनी युक्तीवाद केला आहे.
यूपीएससीचे वकील : युपीएससीचा पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध
फक्त पूजाचं नाव बदलेल गेले नाहीये, तिच्या वडिलांचे नाव तिनं सातत्यानं बदललं आहे, तिला ते करायचा अधिकार आहे का? तिच्या आईचं नावही तिनं बदललं आहे, मनोरमा बुधवंत, मनोरमा जे बुधवंत, खेडकर मनोरमा दिलीपराव, असं अनेकदा तिनं नाव बदलंलं आहे.
तिने संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केला आहे, एका प्रामाणिक उमेदवाराची संधी हिरावून घेतली आहे, तपासप्रक्रिया सुरू करावी लागेल, त्यासाठी चौकशी करावी लागेल, त्यासाठी कोठडी घ्यावी लागेल, अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकत नाही, फक्त निर्दोष माणसाला त्रास होऊ नये यासाठी अटकपूर्व जामीनाची तरतूद आहे, त्यांच्यासाठी नाही ज्यांनी कायद्याचा फज्जा उडवला आहे, असा युक्तीवाद करण्यात आला.
चतिच्या वडिलांची प्रॉपर्टी पहा, त्यांनी घटस्फोट घेतला, असं म्हटलं पण मग घटस्फोट होतो तेव्हा आई किंवा वडिलांकडे कस्टडी दिली जाते, जर तुम्ही प्रौढ नसाल तर मेडिकल करण्याची वेळ आली, तेव्हा पूजानं नकार दिला, यांच्या घटस्फोट डिक्री मध्ये यांची कस्टडी कोणाकडे दिली गेली, याविषयी माहिती दिलेली नाही, असा युक्तीवाद दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आहे.
यूपीएससी आणि पूजा खेडकर यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. जर परीक्षाच गैरप्रकार करुन घेतली असेल तर नियमांचा संबंध काय? असा युक्तीवाद यूपीएससीकडून करण्यात आला. त्यानंतर सिव्हिल सर्विस नियमांनुसार, दोषी ठरवल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो, आम्हाला अजून दोषी कुठे ठरवलं गेलं आहे? असं म्हटलं आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महापालिकेमार्फत 20 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन

महापालिकेमार्फत 20 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन  कोल्ह…