no images were found
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी, पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. १० जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, अशी माहिती प्र. संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी दिली.
या प्रवेश प्रक्रियेत बी.ए., बी.कॉम. तसेच एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. यांसारख्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने एम.बी.ए., एम.कॉम. व एम.एस्सी. (गणित) हे अभ्यासक्रम उपलब्ध असून विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही प्रवेश दिला जाणार आहे.
डॉ. कृष्णा पाटील म्हणाले की, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, अपूर्ण शिक्षण असलेल्या तसेच शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, उद्योजक, शेतकरी, गृहिणी, कामगार, सैनिक आदी सर्व घटकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या राज्यभरातील ८६ अभ्यासकेंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेशासंदर्भातील सविस्तर माहिती शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील Distance Education या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/#/loginया ऑनलाइन लिंकद्वारे विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा.
नियमित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुहेरी पदवी (Dual Degree) घेण्याचीही संधी उपलब्ध आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य कार्यालयाशी किंवा नजीकच्या अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा.
वैशिष्ट्ये :
* १२ प्रोग्रामअंतर्गत विविध दूरशिक्षण अभ्यासक्रम
* ०३ ऑनलाईन अभ्यासक्रम
* १५ हून अधिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम
* दुर्गम भागांसह ८६ अभ्यासकेंद्रांची सुविधा
* NET/SET व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन
* MPSC व UPSC परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
* दुहेरी अभ्यासक्रम (Dual Degree) पदवीची सोय
* शैक्षणिक व करिअर विकासाच्या संधी
* ४०० पेक्षा अधिक दर्जेदार स्वयंअध्ययन साहित्य
* अभ्यासकेंद्रांमध्ये संपर्क सत्रांचे आयोजन