no images were found
शिवाजी विद्यापीठात युवा संवाद कार्यशाळा
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने काल ‘युवा संवाद भारत@ २०४७’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. राजर्षी शाहू सभृहात आयोजित कार्यशाळेत शहरातील विविध महाविद्यालयांतून प्रातिनिधिक विद्यार्थ्यांसह विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि अन्य अधिविभागांतील विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यशाळेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवापर्यंत विकसित भारताचे ध्येय, गुलामगिरी व वसाहतवादी मानसिकतेचे उच्चाटन, देशाचा संपन्न वसा व वारसा यांचा अभिमान, भारताची एकता व एकात्मता आणि नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना रुजवण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करणे आदी उद्देशाने कार्यशाळा आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. अविनाश भाले यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक अमोल कुलकर्णी यांनी आभार मानले.