no images were found
खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची कोल्हापूरकरांना संधी
कोल्हापूर : वर्षातील दुसरे खग्रास चंद्रग्रहण चंद्रग्रहण हे दि. ८ नोव्हेंबर होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका,उत्तरआणि पूर्व युरोपचे काही भाग आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतेक भागातून दिसणार आहे तर भारतातून चंद्रोदय नंतर खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. खग्रास चंद्रग्रहणाची सुरवात दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी होणार असून, ५ वाजून ११ मिनिटांनी हे ग्रहण सुटणार आहे.
कोल्हापुरातून मात्र खंडग्रास आणि छायाकल्पचंद्रग्रहण पाहता येईल. कोल्हापुरातून संध्याकाळी ०५ वाजून ५८ मिनिटांनी म्हणजेच चंद्र उदय झाल्यापासून २१ मिनिटे खंडग्रासचंद्रग्रहण दिसेल. या चंद्र ग्रहणाचा मध्य संध्याकाळी ६ वाजता जेव्हा चंद्र क्षितिजाच्या वर असताना असेल. हे खंडग्रास चंद्रग्रहण जरी संध्याकाळ ६ वाजून १९ मिनिटांनी पूर्ण होईल. त्यानंतर ७वाजून २९ मिनिटांपर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण पाहता येईल. चंद्रोदय होण्यापूर्वीच म्हणजे दुपारी २ वाजून ३९मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणास सुरवात होणार असल्याने ग्रहण पाहण्यासाठी पूर्व किंवा पूर्व-ईशान्य दिशेला कोणताही अडथळा नासलेले उंच ठिकाण निवडावे असे शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी सुचवले आहे.
चंद्रग्रहण हे चंद्र, पृथ्वी आणिसूर्य सरळ रेषेत आल्यावर होत असते ज्यामध्ये पृथ्वीची सावली हि चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण आपणास दिसू लागते. तर छायाकल्प ग्रहणात पृथ्वीची पडछाया चंद्रावर पडणारअसून चंद्र पूर्णतः झाकला जाणार नसून पृथ्वीच्या उपछायातुन मार्गस्थ होईल परिणामी तो आपल्याला ताऺबुस रऺगाचा दिसेल.
शिवाजी विद्यापीठात भौतिक शास्त्र विभागातील विद्यार्थी अवकाशविज्ञान प्रयोगशाळेमध्ये असणाऱ्या C+5 सेलेस्ट्रोन दुर्बिणीद्वारे या चंद्रग्रहणाचे निरीक्षण करणार आहेत. सदरच्या निरीक्षणासाठी खगोलप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी नॅनो-सायन्सच्या इमारतीच्या वरील भागात उपस्तित राहावे असे असे आव्हान शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे. या वेळी पौर्णिमेच्या चंद्राचे ग्रहण कालावधीत उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करता येणार आहे आणि त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.