
no images were found
स्कोडा ऑटो आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्यमहोत्सवी वर्ष
मुंबई, – स्कोडा ऑटो इंडियाचे रौप्य महोत्सवी वर्ष भारतातील न्यू एराला देखील साजरे करते, जेथे या उल्लेखनीय टप्प्यामध्ये भारतातील त्यांच्या २५ वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद झाली आहे. मार्च २०२५ मध्ये स्कोडा ऑटो इंडियाने ७,४२२ युनिट्सची विक्री केली, जी भारतातील ब्रँडद्वारे आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री आहे. नवीन कायलॅक एसयूव्ही लाँच करण्यासह रणवीर सिंग कंपनीचे पहिले ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर हे यश संपादित करण्यात आले आहे, जेथे जागरूकता आणि विचारसरणीला चालना मिळत आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा या उल्लेखनीय विक्रीबाबत मत व्यक्त करत म्हणाले, ”नवीन कायलॅकच्या लाँचसह आम्ही भारतातील आमच्या प्रवासामध्ये ‘न्यू एरा’प्रती कटिबद्ध आहोत. मार्च २०२५ मध्ये आम्ही विक्री केलेल्या ७,४२२ कार्समधून या प्रवासाला मिळत असलेला आकार दिसून येतो, तसेच शाश्वत नियोजन, प्रयत्न आणि धोरणामुळे हा टप्पा गाठण्यात आला आहे, ज्यांचा भारतातील रस्त्यांवर युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याचा मनसुबा आहे. ग्राहक अभिप्रायामधून निदर्शनास येते की कायलॅक अपवादात्मक किंमत-मूल्य तत्त्वासह येते, सेगमेंटमधील आरामदायीपणा, स्पेस व सुरक्षिततेला सब-४-मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये घेऊन जाते. अधिकाधिक ग्राहकांना सक्षम करण्यासाठी आणि कायलॅकच्या यशाला साजरे करण्यासाठी आम्ही सुरूवातीची किंमत एप्रिल अखेरपर्यंत विस्तारित करण्याचे ठरवले.”
कायलॅक: उच्च प्रगतीला चालना देत आहे
भारतातील स्कोडा ऑटोसाठी आतापर्यंतच्या सर्वाधिक मासिक विक्रीची प्रमुख स्रोत आहे नवीन कायलॅक, जिची फेब्रुवारी २०२४ मध्ये घोषणा करण्यात आली होती. भारतीयांनी या कारचे नामकरण केले होते आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये लाँच होण्यासह जानेवारी २०२५ मध्ये डिलिव्हरीजना सुरूवात झाली. ही स्कोडा ऑटो इंडियाची पहिली सब-४-मीटर एसयूव्ही आहे आणि फाइव्ह-स्टार सेफ रेटेड कार्सच्या स्कोडा परिवारामध्ये प्रवेश केला आहे. तिन्ही स्कोडा कार्स एमक्यूबी-एओ-एइन प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आल्या आहेत. कुशक, स्लाव्हिया आणि कायलॅकने प्रौढ व्यक्ती व मुलांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण फाइव्ह स्टार मिळवले आहेत. कुशक आणि स्लाव्हियाची ग्लोबल एनसीएपीद्वारे चाचणी करण्यात आली, तर नुकतेच भारत एनसीएपी अंतर्गत कायलॅकची चाचणी करण्यात आली.
वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कायलॅक निर्माणामध्ये झपाट्याने रॅम्प-अप करत आहे, जेथे बुकिंग्ज केलेल्या, तसेच बुकिंग्ज करणाऱ्या सर्व ग्राहकांना (१५,००० हून अधिक) मे अखेरपर्यंत डिलिव्हरी करण्याचा मनसुबा आहे.
ग्राहकांसाठी अधिक सोयीसुविधा
ब्रँडने २०२१ मधील १२० वरून आतापर्यंत २८० पर्यंत आपल्या टचपॉइण्ट्सचे नेटवर्क देखील विस्तारित केले, जेथे यंदा ही आकडेवारी ३५० पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. स्कोडा ऑटो इंडियाने इनोव्हेशन्स देखील सादर केले, जसे फुली डिजिटलाइज्ड शोरूम्स, ऑनलाइन-ओन्ली सेल्स, अॅड-ऑन एनीटाइम वॉरंटी, सर्विस पारदर्शकता जसे स्कोडा सर्विस कॅम, स्पर्धात्मक मेन्टेनन्स खर्च आणि सर्विस किमतीमधील वाढीसंदर्भात संरक्षणासह स्कोडा सुपरकेअर. तसेच, स्कोडा ऑटो इंडियाने नुकतेच सर्व नवीन स्कोडा ग्राहकांसाठी एक-वर्ष कॉम्प्लीमेण्टरी सुपरकेअर मेन्टेनन्स पॅकेज सादर केले, ज्यामुळे ग्राहक व चाहत्यांसाठी सर्विस व मेन्टेनन्स खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.