no images were found
विद्यापीठामध्ये नवी औद्योगिक क्रांती आणि संधी या विषयावर उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे यांचे व्याख्यान
कोल्हापूर( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय फाउंड्री दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ उद्योग कक्ष व इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्री मैन कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यामाने श्री प्रफुल्ल वानखेडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. प्रमुख वक्ते हे गोष्ट पैशापाण्याची या प्रसिदृध पुस्तकाचे लेखक असून आजपर्यंत त्यांनी आर्थिक साक्षरता व आर्थिक व्यवस्थापन या विषयावरती वेगवेगळया वत्तपत्रामधुन लिखान केले
आहे.तसेच ते औष्णीक ऊर्जा व इंधनाचे ज्वलनशीलता आणि ऊर्जेचे संरक्षण या क्षेत्रात गेल्या दोन दशकापासून ओळखले जाणारे एक प्रमुख नाव आहे. ते भारत सरकारच्या बी.आय.ए.एस. समितीच्या अभियांत्रिकी विभागाशी संलग्न तांत्रिक समितीचे सदस्य आहेत. ते नवी औद्योगिक क्रांती आणि संधी या विषयावरती आपले विचार मांडणार आहेत. सदरचा कार्यक्रम हा कुलगुरू डॉ- डी- टी- शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता विद्यापिठाच्या शाहू सभागृहात होणार आहे. तरी, सदर व्याख्यानाचा शिक्षक, विध्यार्थी, उद्योजक या सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठ उद्योग कक्षाचे समन्वयक डॉ. एस. डी. डेळेकर यांनी केले आहे.