no images were found
केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार- देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांमधून संतप्त भावना उमटत आहे. राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावरती उतरून शेतकरी आंदोलन करत आहे. अशात केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री जपान दौऱ्यावर आहेत. त्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मंत्री पीयूष गोयल यांच्याशी निर्यातशुल्काबाबत चर्चा केली.