Home उद्योग सयाजी हॉटेल्सने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी’द्वारे व्यवसाय-केंद्रित हॉटेल सुरू करत केला धोरणात्मक विस्तार

सयाजी हॉटेल्सने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी’द्वारे व्यवसाय-केंद्रित हॉटेल सुरू करत केला धोरणात्मक विस्तार

7 second read
0
0
13

no images were found

सयाजी हॉटेल्सने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी’द्वारे व्यवसाय-केंद्रित हॉटेल सुरू करत केला धोरणात्मक विस्तार

सांगली, : पश्चिम महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घडामोडीत सयाजी हॉटेल्सने आपल्या ‘एफोटेल’ ब्रँडअंतर्गत ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ या नव्या हॉटेलच्या सुरूवातीची घोषणा केली आहे. सांगली–मिरज रोडवरील शिव आर सिटी मॉलमध्ये धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आलेले हे हॉटेल सांगली शहरात सयाजी समूहाचा ठळक आणि योग्य वेळी झालेला प्रवेश दर्शवते. व्यापारी व कृषी क्षेत्रात भक्कम ओळख असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार ब्रँडेड निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली कमतरता लक्षात घेता, ही नवीन सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
या नव्या हॉटेलच्या समावेशामुळे ‘एफोटेल बाय सयाजी, सांगली’ हे महाराष्ट्रातील ‘एफोटेल’ ब्रँडचे तिसरे हॉटेल ठरले आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील सरोला आणि नवी मुंबई येथील हॉटेल्स त्याच्या सिस्टर प्रॉपर्टीज् आहेत. या विस्तारातून सयाजी समूहाची महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक बळकट होत असून टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मध्यम-उच्च दर्जाची आदरातिथ्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करते.
एफोटेल बाय सयाजी, सांगली येथे एकूण ५९ सुबक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अतिथी कक्ष/ रूम्स उपलब्ध आहेत. हे कक्ष पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहेत : १५ ग्रँड रूम्स (२८४ चौ. फूट), ३४ प्रीमियम ग्रँड रूम्स (३०९ चौ. फूट), ६ एक्झिक्युटिव्ह ग्रँड रूम्स (३७३ चौ. फूट), २ ग्रँड सूट्स (५०६ चौ. फूट) आणि २ प्रीमियम सूट्स (७६६ चौ. फूट). व्यवसायिक प्रवासी, विश्रांतीसाठी येणारे पर्यटक तसेच दीर्घकाळ मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा लक्षात घेऊन या खोल्यांची रचना करण्यात आली आहे.
या हॉटेलमधील भोजन व्यवस्था हीदेखील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. येथे दोन वेगवेगळे फूड अँड बेव्हरेज आऊटलेट्स उपलब्ध आहेत—‘द क्यूब’, १२० आसन क्षमतेचे दिवसभर सुरू असलेले डायनिंग रेस्टॉरंट आणि ‘गुड ओल्ड डेज’, ३० पाहुण्यांसाठी आसन व्यवस्था असलेला बार आहे. या दोन्ही ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांसह शहरातील नागरिकांनाही दर्जेदार भोजनाचा अनुभव घेता येणार आहे.
या हॉटेलमध्ये ‘जार्डिन १’ आणि ‘जार्डिन २’ असे दोन बहुउपयोगी बँक्वेट हॉल उपलब्ध आहेत. ‘जार्डिन १’ सुमारे ४,२९५ चौ. फूट क्षेत्रफळाचा असून थिएटर पद्धतीच्या आसन व्यवस्थेत ३५० पाहुण्यांपर्यंत क्षमता आहे. तर ‘जार्डिन २’ चे क्षेत्रफळ २,३५५ चौ. फूट असून त्यात थिएटर पद्धतीने १५० पाहुण्यांची व्यवस्था करता येते. या सुविधांमुळे एफोटेल बाय सयाजी, सांगली हे शहरातील एमआयसीई (मीटिंग्स, इन्सेंटिव्ह्स, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स) तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले प्रमुख ठिकाण ठरणार आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सांगलीमध्ये उच्च दर्जाच्या बँक्वेट सुविधांची कमतरता असल्याने ही सुविधा शहरासाठी महत्त्वाची ठरणार आहे. Top of Form

Bottom of Form
भारताची ‘हळदीची राजधानी’ म्हणून ओळखले जाणारे सांगली हे द्राक्ष उत्पादनासाठीही प्रसिद्ध असलेले एक समृद्ध कृषी व व्यापारी केंद्र आहे. हे हॉटेल सांगली रेल्वे स्थानकापासून सुमारे ७ किमी तर कोल्हापूर विमानतळापासून सुमारे ५० किमी अंतरावर सोयीस्कर ठिकाणी असल्यामुळे देशांतर्गत प्रवासी तसेच प्रादेशिक पाहुण्यांसाठी सहज आणि सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होते.
सांगलीचे हेस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण हे शहर प्रमुख सांस्कृतिक व व्यापारी केंद्र असलेल्या कोल्हापूरच्या जवळ आहे. कोल्हापूर येथे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर तसेच वेगाने विकसित होत असलेला व्यावसायिक क्षेत्र आहे. याशिवाय या भागातून युनेस्को जागतिक वारसा स्थळ असेलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य, सांगली किल्ला आणि निसर्गरम्य दंडोबा हिल्स फॉरेस्ट रिझर्व्ह या पर्यटनस्थळांना सहज भेट देता येते. तसेच नरसोबाचीवाडी आणि श्रीक्षेत्र औदुंबर यांसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमुळे वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते.
सयाजी हॉटेल्सचे असोसिएट जनरल मॅनेजर राजेंद्र जोशी म्हणाले, “सांगली हे आर्थिकदृष्ट्या सक्रिय आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. मात्र, या शहराच्या प्रतिष्ठेला साजेशी ब्रँडेड आदरातिथ्य सुविधा आतापर्यंत उपलब्ध नव्हती. एफोटेल बाय सयाजी, सांगली या माध्यमातून ती उणीव भरून निघत आहे. हे केवळ आणखी एक हॉटेल सुरू होणे नाही, तर संपूर्ण प्रदेशातील प्रवास आणि कार्यक्रमांच्या अनुभवाला नवे परिमाण देण्याची आमची बांधिलकी आहे. ‘एफोटेल’ ब्रँडच्या माध्यमातून आम्ही गुणवत्ता, आत्मीयता आणि किमतीच्या दृष्टीने मूल्य देण्याचे आश्वासन अशा बाजारपेठांमध्ये घेऊन येत आहोत. कोल्हापूर–सांगली पट्टा व्यवसाय आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांसाठी प्रचंड क्षमता असलेला आहे आणि आमच्या समूहाच्या वतीने येथे उपस्थिती नोंदवताना आम्हाला अभिमान वाटतो.”
एलकेजी लाइफस्टाईल एलएलपीचे संचालक, अविनाश गंगवानी म्हणाले, “या प्रकल्पाची संकल्पना मांडताना आम्हाला एक स्पष्ट उणीव जाणवली. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सांगली शहरात येणाऱ्या पर्यटकांना आणि व्यावसायिक प्रतिनिधींना दर्जेदार निवासाच्या पर्यायांची कमतरता होती. एफोटेल बाय सयाजी परिवाराचा भाग बनल्यामुळे आम्हाला केवळ विश्वासार्ह ब्रँडचे नावच मिळत नाही, तर उत्कृष्ट आदरातिथ्याचा सिद्ध अनुभवही मिळतो. आता आम्ही आमची प्रॉपर्टी सयाजी ग्रुपला सोपवली आहे, आम्हाला त्यांच्या उत्कृष्ट सेवेवर आणि ऑपरेशनल कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की, हे हॉटेल महाराष्ट्राच्या आदरातिथ्य नकाशावर सांगलीचे स्थान अधिक भक्कम करेल. तसेच, विशेषतः कोल्हापूर परिसरातील तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांच्या जवळीक लक्षात घेता, शहरातील पर्यटन आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांच्या वाढत्या परिसंस्थेला हे हॉटेल निश्चितच चालना देईल.”
सांगलीच्या बाजारपेठांना भेट देणारे कृषी व्यापार क्षेत्रातील व्यावसायिक, कुटुंबासह प्रवास करणारे पर्यटक, भाविक, कॉर्पोरेट प्रतिनिधी तसेच एमआयसीई गट यांच्यासाठी हे हॉटेल एक आदर्श पर्याय ठरणार आहे. तसेच कोल्हापूर–सांगली परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सांगलीला मुक्कामाचे ठिकाण म्हणून निवडणाऱ्या पर्यटकांसाठीही हे हॉटेल नैसर्गिकरित्या पहिली पसंती ठरेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…