Home बँकिंग एचडीएफसी  बँकेने पटकावला ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्कार

एचडीएफसी  बँकेने पटकावला ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्कार

15 second read
0
0
7

no images were found

एचडीएफसी  बँकेने पटकावला ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्कार

 

मुंबई,: युरोमनी प्रायव्हेट बँकिंग अवॉर्ड्स 2025 मध्ये भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक- एचडीएफसी बँक ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्काराची मानकरी ठरली. युरोमनी मॅगझीनने या पुरस्कारांचे आयोजन केले होते.आपल्या वेबसाइटवर युरोमनीने लिहिले, “आपल्या इम्पिरिया प्रोग्रामद्वारे भारताच्या हाय नेटवर्थ (एचएनडब्लू) सेगमेन्टमध्ये एचडीएफसी बँकेने आपला वेग वाढवत नेला आहे. इम्पिरिया प्रोग्राम ही एक प्रीमियम सेवा आहे, जी व्यक्तीविशिष्ट वेल्थ सोल्यूशन्स देऊ करते. या ऑफरिंगच्या मुळाशी एक असे मॉडेल आहे, ज्यामध्ये वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर्स बँकेतील तज्ज्ञांच्या सोबत काम करून खास आखीव असे गुंतवणूक आणि बँकिंग सहाय्य प्रदान करतात.”

     युरोमनीने पुढे म्हटले आहे, “डिजिटल क्षेत्रात, या बँकेने नुकताच एक स्मार्टवेल्थ प्रोग्राम दाखल केला आहे. ही एक गुंतवणूक सेवा आहे, आणि समाजातील संपन्न वर्गापर्यंत कव्हरेज वाढवण्याचा तिचा उद्देश आहे. हा मोबाइल प्लॅटफॉर्म ग्राहकांना आपला पोर्टफोलियो ट्रॅक करण्याची, गुंतवणूक करण्याची आणि लक्ष्य-आधारित गुंतवणुकीच्या शिफारसींपर्यंत पोहोचण्याची क्षमता प्रदान करतो. गेमीफिकेशन आणि सहज यूझर अनुभव यांची सांगड घालून ‘स्मार्टवेल्थ’ बँकेच्या संशोधन क्षमतांपर्यंत सर्वांना पोहोच देतो व अशाप्रकारे खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांना स्वतंत्रपणे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम बनवतो.”

      एचडीएफसी बँकेच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग, प्रायव्हेट बँकिंग, इंटरनॅशनल बँकिंग, डिजिटल इकोसिस्टम आणि बीएएएस चे ग्रुप हेड राकेश के. सिंह म्हणाले, “इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ महणून आमची निवड झाली, हा आम्ही आमचा गौरव मानतो. हा आमचा विश्वास आहे की आम्ही ग्राहकांच्या संपत्तीचे रक्षण करण्याच्या, त्यातील वाढ सुनिश्चित करण्याच्या आणि त्यांचा विश्वास जपण्याच्या व्यवसायात आहोत. आमचा मजबूत ब्रॅंड तसेच अडीच दशकांपेक्षा मोठा अनुभव यामधून आमच्या ग्राहकांचा विश्वास दिसून येतो. आमच्या दमदार प्रक्रिया आणि परिश्रमपूर्वक संशोधन करण्याच्या पद्धतींमार्फत आम्ही हा विश्वास आणखी दृढ केला आहे. अल्ट्रा ‘एचएनडब्लू’ पासून ते सुपर अॅफ्लूएन्ट ते मास-अॅफ्लूएन्ट सेगमेन्टपर्यंत आमचे रिलेशनशिप मॅनेजर आमच्या ग्राहकांच्या गुंतवणुकीच्या संदर्भातील विशिष्ट आणि सतत बदलणाऱ्या मागण्या व त्यांची ध्येये समजून घेऊन त्या पूर्ण करण्यास सुसज्ज आहेत. या वर्षी, स्मार्टवेल्थ हा आमचा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करून आम्ही आमचे लक्ष विशेषतः मास-अॅफ्लूएन्ट श्रेणीवर केंद्रित केले आहे. स्मार्टवेल्थ हा डिजिटल प्लॅटफॉर्म गरजेनुसार, शिफारसीवर आधारित जोखीम पत्करण्याच्या क्षमतेद्वारे गुंतवणूक करण्यासाठीच्या, मदतीशिवायच्या प्रवासाने सुसज्ज आहे. यामुळे प्रत्येक ग्राहकाला, विशेषतः आजच्या डिजिटल जगाशी दोस्ती असलेल्या पिढीला एक विशेष आणि खास तयार केलेली गुंतवणूक सेवा अनुभवता येते.”

     युरोमनीचा प्रायव्हेट बँकिंग अवॉर्ड्स हा जगभरातील खाजगी बँकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट उद्योगासाठी एक प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कार सोहळा असतो. 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून या प्रोग्रामने महत्त्वाच्या श्रेणींमधील उत्कृष्ट खाजगी बँकांना नावाजले आहे. या श्रेणींमध्ये हाय ते अल्ट्रा-हाय नेटवर्थ, फॅमिली ऑफिस सर्व्हिसेस, सक्सेशन प्लॅनिंग, डिजिटल सर्व्हिसेस, विवेकपूर्ण पोर्टफोलियो व्यवस्थापन, सस्टेनेबिलिटी आणि अशा इतर श्रेणींचा समावेश आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …