no images were found
स्व.दादासाहेब यांच्या शतकोत्तर वर्षानिमित्त कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव
भोगावती सहकारी साखर कारखान्याचे आद्य संस्थापक स्व.दादासाहेब पाटील- कौलवकर (आबाजी) यांच्या शतकोत्तर वर्षानिमित्त भोगावती परिसराच्या भरभराटीसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा विचार मनामध्ये आला. भोगावती सहकारी साखर कारखाना व भोगावती परिसराच्या भरभराटीसाठी कारखाना कर्मचाऱ्यांचे योगदान दुर्लक्षित करुन चालणार नाही. शेतकरी व कर्मचारी हे कारखान्याचे महत्वाचे घटक आहेत. म्हणून गेल्या काही दिवसांपासून मी ‘शेतकरी संवाद दौरा ‘ चालू केला आहे.जातो त्या गावामध्ये भरभरुन प्रेम मिळत आहे. भोगावतीचा शेतकरी, कर्मचारी यांचे कौलवकर घराण्याशी असलेले ३ पिढ्यांचे ॠणानुबंध विसरण्यासारखे नाहीत याची जाणीव होते.स्व.आबाजी,स्व.आनंदराव पाटील -कौलवकर साहेब यांच्या आठवणींना प्रत्येक गावात उजाळा मिळतो, हे पाहून मन भरुन जाते. भोगावती परिसरातील कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मानपत्र देऊन गौरविताना आम्हा स्व.दादासाहेब पाटील- कौलवकर तथा आबाजींच्या कुटूंबियांना विशेष आनंद होत आहे.