
no images were found
जलजीवन मिशन योजने अंतर्गत निमशिरगावसाठी पाणी योजना मंजूर
जयसिंगपूर : ता. शिरोळ मधील निमशिरगाव गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत २ कोटी ८२ लाख ३२ हजारच्या निधीला माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून तांत्रिक मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यता मिळून निमशिरगाव पाणी योजनेसाठीची निविदाही प्रसिद्ध करण्यात येईल. अल्पाव्धीतच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.