no images were found
नॅशनल आईस स्टॉक स्पोर्ट्स स्पर्धेत दूरशिक्षण केंद्राच्या श्रेयस कोळीचे यश
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात अर्थशास्त्र द्वितीय वर्षाचा विद्यार्थी श्रेयस पांडुरंग कोळी याने राष्ट्रीय आईस स्टॉक स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण व एक रजत पदक प्राप्त करून मोठे यश संपादन केले आहे. जम्मू व काश्मीर येथील गुलमर्ग येथे इंडियन आईस स्टॉक फेडरेशनच्या वतीने दि. ९ ते १२ मार्च २०२४ या कालावधीत या स्पर्धा झाल्या.
आईस स्टॉक या खेळामध्ये पाच प्रकार आहेत. सांघिकमध्ये टीम टार्गेट, टीम डिस्टन्स, टीम गेम आणि वैयक्तिक प्रकारामध्ये इंडिव्हिज्युअल टार्गेट आणि इंडिव्हिज्युअल डिस्टन्स यांचा समावेश आहे. टीम टार्गेट प्रकारात स्कोर किंवा पॉइंट्स मिळवायचे असतात. टीम गेममध्ये खेळातील क्वीनच्या जवळ ज्या टीमचा स्टॉक शेवटपर्यंत राहतो, ती टीम पॉइंट्सद्वारे जिंकते. टीम डिस्टन्स या प्रकारात शक्य तितक्या लांब अंतरापर्यंत आपल्याला स्टॉक स्लाईड करावयाचा असतो. या स्पर्धेमध्ये श्रेयस कोळी याने यश मिळविले. श्रेयस कोळी याला इंडियन आईस स्टॉक फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश राठोड, सोमेश सनदी, अजय सरवदे, प्रवीणसिंह कोळी, यश सरनाईक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. डी.के. मोरे, उपकुलसचिव डॉ.संजय कुबल, चंद्रकांत कोतमिरे, विशेष कक्ष
उपकुलसचिव विभा अंत्रेडी, समन्वयक डॉ. कृष्णा पाटील, अर्थशास्त्राचे डॉ. प्रसाद दावणे, डॉ. नितीन रणदिवे यांनी अभिनंदन केले.