Home शासकीय महापालिकेच्यावतीने परवाना फीमध्ये चालुवर्षी कोणतीही वाढ नाही

महापालिकेच्यावतीने परवाना फीमध्ये चालुवर्षी कोणतीही वाढ नाही

4 second read
0
0
31

no images were found

महापालिकेच्यावतीने परवाना फीमध्ये चालुवर्षी कोणतीही वाढ नाही

कोल्हापूर  : महापालिकेच्यावतीने सन 2024-25 साठी परवाना फीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. अग्निशमन विभागाच्या फीमध्ये तीन वर्षे कोणतीही वाढ केलेली नसल्याने चालु वर्षी सन 2024-25 मध्ये नवीन परवानाधारकांना अग्निशमन फीमध्ये 10 टक्के व जुन्या परवानाधारकांना 5 टक्के वाढ करण्यात आलेली आहे. परंतु व्यापारीवर्गामध्ये सरसकट परवाना व अग्निशमन फीमध्ये वाढ केली असल्याचे गैरसमजातून तक्रारी आल्या आहेत. चालु वर्षीच्या परवाना फीमध्ये तांत्रीक कारणामुळे गतवर्षीपेक्षा काही व्यापा-यांना वाढ आलेस सदरची बाब परवाना विभागाच्या निदर्शनास आणून दयावी. सदरची तक्रार आलेस तात्काळ परवाना विभागाकडून तपासणी अंती व्यापाऱ्यांच्या परवाना फीमध्ये दुरुस्ती करुन देण्यात येईल. याबाबत उप-आयुक्त साधना पाटील व व्यापारी प्रतिनिधी यांची आज महापालिकेत संयुक्त बैठक होऊन महापालिका व व्यापा-यांच्यात समन्वय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी व्यापा-यांनी लवकरात लवकर परवाना फी भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…