
no images were found
मॅनहोलची सक्शन कम जेटींग विथ वॉटर रिसायकलर मशीनद्वारे स्वच्छता
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरातील मान्सुनपुर्व ड्रेनेज लाईन तसेच मॅनहोलची स्वच्छता करण्यासाठी सक्शन कम जेटींग विथ वॉटर रिसायकलर मशीन उपलब्ध करुन घेण्यात आलेले आहे. या मशीनद्वारे आज मंगळवारपासून बिनखांबी गणेश मंदीर, अर्धा शिवाजी पुतळा, निवृत्ती चौक व महालक्ष्मी मंदिर परिसरातील मॅनहोलची व ड्रेनेजलाईनमधील साठलेला गाळ काढुन सफाई करण्यात आली. पावसाळापुर्वी या मशीव्दारे व मनुष्यबळाद्वारे शहरातील सर्व ठिकाणची ड्रेनेज लाईन व मॅनहोलची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमार्फत शहरातील मान्सुनपुर्व नालेसफाई व चॅनलसफाई सफाईचे कामकाज सुरु आहे. यामध्ये मनुष्यबळ याव्दारे 222 चॅनल्सची सफाई करण्यात आली असून जेसीबी मशीनव्दारे 70 चॅनल्सची सफाई करण्यात आलेली आहे. तर पोकलॅण्डव्दारे 4 मोठे नाल्यांची सफाई करण्यात आलेली आहे.