Home राजकीय पुणे पोटनिवडणुकीसाठी अमित शाहंसह तब्बल ४० स्टार प्रचारक

पुणे पोटनिवडणुकीसाठी अमित शाहंसह तब्बल ४० स्टार प्रचारक

16 second read
0
0
53

no images were found

पुणे पोटनिवडणुकीसाठी अमित शाहंसह तब्बल ४० स्टार प्रचारक

पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर भाजप-शिंदे विधान सभेच्या  पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जनतेचा कौल घेण्यासाठी सामोरे जात आहेत. पुण्यासारख्या हक्काच्या जिल्ह्यात जागा राखण्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेत आहे.   म्हणूनच पुण्याती पोट निवडणुकीसाठी  थेट देशाचे गहमंत्री अमित शाहदेखील पुण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाजपचे 40 स्टार प्रचारकदेखील निश्चित आहेत. त्यंची यादीही भाजपने निश्चित केली आहे.                  कसब्यात महाविकास आघाडीला बंडखोरी रोखण्यात यश आलं मात्र चिंचवडमध्ये बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली. कसब्यात बाळासाहेब दाभेकर, आप आणि संभाजी ब्रिगेडने उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ असं जाहीर केलं. यामुळे कसब्यात महाविकास आघाडीचा मार्ग सुकर झाला. मात्र ब्राह्मणांना उमेदवारी नाकारल्याने हिंदू महासंघ पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरलं आहे. अध्यक्ष आनंद दवे हे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढणार आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपची मतं फुटण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परंपरागत असलेला भाजपच्या बालेकिल्ल्यात आता भाजपलाच मोठ्या तयारीने निवडणुकीच्या रिंगणार उतरावं लागणार आहे. 

    भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करून घेण्यात आला आहे. त्यांच्यावर आता पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धुरा या सगळ्यांकडे सोपवण्यात आली आहे. 

     त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ,विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक,आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा चाळीस जणांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…