Home आरोग्य दुचाकीवर सुर्यनमस्कार घालणाऱ्या रोहित शिंदेची इंडिया, एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

दुचाकीवर सुर्यनमस्कार घालणाऱ्या रोहित शिंदेची इंडिया, एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

10 second read
0
0
111

no images were found

दुचाकीवर सुर्यनमस्कार घालणाऱ्या रोहित शिंदेची इंडिया, एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

बारामती : १४ जानेवारी जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त चालू मोटारसायकलवर २० सेकंदामध्ये सुर्यनमस्कार घातले, म्हणून रोहित दिलीप शिंदे यांची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.  मोटार सायकलवर १० वेळा सुर्यनमस्कार घालणारा तो जगातील पहिला मोटार सायकल रायडर आहे. तो वयाच्या १६वर्षापासून मोटार सायकल रेस करीत आलेला आहे. गेल्या १२ वर्षापासून मोटार सायकल रायडींग करून आतापर्यंत ३००हून अधिक मोटार सायकल रायडिंग शोमध्ये तो सहभागी झाला आहे.

     मोटार सायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडींग ऑफ रोडींग, ऍटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या झारखंडमधील रांची येथे मोटार सायकल रायडींगमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.  त्यामध्ये देशातील७०रायडरने भाग घेतला होता. केटीएम कंपनीच्या आरसी ३९० सीसी गाडीवर रेस जिंकून चेन्नई येथे होणार्‍या ट्रॅक रेसिंग नॅशनल स्पर्धेसाठी रोहितची निवड झालेली आहे. यामध्ये प्रथम दहामध्ये येणार्‍यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत भाग घेता येणार आहे असे बजाज ऍटो लि.चे अध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले.

      सन २०१८ मध्ये मोटार सायकल रायडींगमध्ये रोहित महाराष्ट्रात पहिला व केरळमध्ये देशात तिसरा आला होता तर सन २०१९ मध्ये हैद्राबाद मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. यापूर्वी तामिळनाडू कोईमतूर मध्ये झालेल्या मोटार सायकल रायडींगमध्ये वेगवेगळ्या तीन स्पर्धेमध्ये रेकॉर्ड करून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे यांनी देशात पहिला क्रमांक मिळविला होता. सीआरएफ कंपनीने स्टंट वॉलफेअर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये फ्री स्टाईल स्टंट रायडींग ऑबस्टूकल टाइम चॅलेंज व लास्ट मॅन स्टँडींग या तिन्ही स्पर्धामध्ये रोहितने अव्वलस्थान पटकाविले होते.

     मोटारसायकल एका चाकावर उचलून जास्तीत जास्त गाडी गोल फिरविण्याची स्पर्धा होती. केवळ ८मी.२८ सेकंड एवढ्या कालावधीत तिन्ही स्पर्धेत रेकॉर्ड केले होते. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट रायडिंगमध्ये पहिला खेळाडू ठरला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…