
no images were found
राज्यात थंडी येण्याची शक्यता ?
मुंबई : थंडी गायब होऊन राज्यात काहीसा उकाडा जाणवत असतानाच आता पुन्हा एकदा बोचर्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या मते, राज्यातील तापमानात पुढचे काही दिवस बदल अपेक्षित आहेत.
अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात घट होणार असून, त्यामुळे पुन्हा हुडहुडी भरणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम उत्तर विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात जाणवणार आहे तसेच काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रतही दिसून येयेल. परिणामी पुढील आठवड्याची सुरुवात थंडीने होणार आहे. पश्चिमी झंझावात सकि’य असल्यामुळे आसाम आणि सिक्कीममध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशातील पर्वतीय भागांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा तडाखा बसू शकतो.