Home सामाजिक गोकुळच्या दुध दरातही २ ते ४ रुपयाची  वाढ

गोकुळच्या दुध दरातही २ ते ४ रुपयाची  वाढ

7 second read
0
0
329

no images were found

गोकुळच्या दुध दरातही २ ते ४ रुपयाची  वाढ

मुंबईः  गोकूळने शुक्रवारी एक लीटर दूधासाठी २- ४ रुपयांपर्यंत वाढ केली असून गोकुळचे फुल क्रीम मिल्कची किंमत यापूर्वी ६९ होती ती आता तीन रुपयांनी वाढवून ७२ इतकी करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेटवर ताण पडण्याची चिन्हे आहेत.
      अमूल आणि गोवर्धनने  दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन आणि मिल्क प्रोडक्शन कॉस्टमध्ये वाढ झाल्याने दूधाच्या किंमतीत वाढ केल्याचं गोवर्धन कंपनीने म्हटलं होतं. अमूल डेअरीने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच दूधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर गोवर्धननेही २ रुपयांनी वाढ केली होती अर्धा लीटरच्या दोन दूध पिशव्यांची किंमत आधी ७० रुपये होती. मात्र, दर वाढवल्यानंतर ती ७२ रुपये इतकी असेल. ग्राहक मोठ्या प्रमाणात वापरत असलेल्या पाच लीटरच्या पॅकेजच्या किंमत ३६० रुपये इतकी असेल. गोकुळने गायीच्या दुधाचे दर ५४ वरुन ५६ रुपये केले आहेत. तर टोन्ड दूध ५२ रुपयांवरुन ५४ रुपयांवर पोहोचले आहे. तर स्पेशल दुधाची किंमतीत चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे

     पुणे- मुंबईत गोकुळचे दर एकसारखेच आहेत पण कोल्हापुरात गोकुळचे दूध इतर शहरांच्या तुलनेत २ ते ६ रुपयांनी स्वस्त दरात उपलब्ध होतेय. गोकुळ महाराष्ट्रात दररोज १४ लाख लिटर दुधाची विक्री करते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…