
no images were found
काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीत हल्ला झाल्याची माहिती आहे. आमदार प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करत आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं प्रज्ञा सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर असताना, माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कुणाचेही वाईट केलेले नाही. महिला आमदारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी, मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन. कारण राजीव भाऊंचे आशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांच्यासारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले आहेत. मात्र, त्यांनी घरी न बसता आपले काम सुरु ठेवले. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता”, असं प्रज्ञा सातव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.