
no images were found
रशियाकडील तेल खरेदीसाठी भारतीय कंपन्यांनी शोधला अनोखा मार्ग
नवी दिल्ली: युरोपिअन देशांनी रशियावर निर्बंध लादले असतानाही भारताने कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी वेगवगळे मार्ग शोधले आहेत. यातून रुपया-रुबलचा व्यापार नव्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे.
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यापासून पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आणि रशियन तेलाची निर्यात थांबवली. पण भारताने निर्बंधांना न जुमानता रशियन तेलाची खरेदी सुरु ठेवली आणि आज रशिया भारताचा सर्वात मोठा तेल आयातदार बनला आहे. युरोपिअन देशांनी रशियावर निर्बंध लादले असतानाही भारताने कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी वेगवगळे मार्ग शोधले. अशा प्रकारे रुपया-रुबलचा व्यापार नव्या स्तरावर जाऊन पोहोचला. यादरम्यान, आता भारतीय कंपन्यांनी देखील रशियन तेल खरेदीचा नवा मार्ग शोधला आहे, जो संयुक्त अरब अमिरातीमधून (युएई) जातो. म्हणजेच, तेथे वापरले जाणारे चलन दिरहमचा वापर करून भारतीय कंपन्या रशियन तेल खरेदी करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, बीपीसीएल आणि नायरा एनर्जी रशियन तेल खरेदीसाठी दिरहम वापरत आहेत. अशा प्रकारे ते पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध टाळत आहेत.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, विशिष्ट व्यापार्यांच्या मागणीनुसार पेमेंट्स कार्गोमध्ये बदलत आहेत. पण रिलायन्स, बीपीसीएल आणि नायरा यांनी यावर त्वरित प्रतिक्रिया दिली नाही. रशियन तेलाच्या आयातीवर युरोपियन युनियनच्या निर्बंधानंतर रशिया भारताचा कच्च्या तेलाचा प्रमुख पुरवठादार बनला आहे. जूनपासून भारताने रशियाकडून सर्वोच्च क्रूड तेलाची खरेदी केली असून यापूर्वी युरोपात जाणारा माल आता आशियाकडे वळला आहे. भारताला विकले जाणारे तेल ६० डॉलर प्रति बॅरलच्या खाली विकले गेले.