Home राजकीय भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी ‘निद्रिस्थ’ अण्णा हजारेंनी पुढाकार घ्यावा -हेमंत पाटील

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी ‘निद्रिस्थ’ अण्णा हजारेंनी पुढाकार घ्यावा -हेमंत पाटील

2 min read
0
0
197

no images were found

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी ‘निद्रिस्थ‘ अण्णा हजारेंनी पुढाकार घ्यावा –हेमंत पाटील

 

मुंबई, देशातील सर्वाधिक प्रगतशील राज्य महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची वाळवी पोखरत आहे. प्रशासनाच्या सर्वच विभागाला ही वाळवी लागल्याने राज्याच्या विकासाला खिळ बसण्याची भीती निर्माण झाली आहे.समाजसुधारक आणि भ्रष्टाचाराविरोधात अवघ्या देशाला झोपेतून जागवणारे अण्णा हजारे मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘निद्रिस्थ’ अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.अण्णांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी आता जागे व्हावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी  केले.राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट विभाग म्हणून महसुल खाते कृप्रसिद्ध आहे.पोलीस विभाग, जलसंधारण, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागातही मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार व्याप्त आहे. अशात भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्यासाठी अण्णांनी पुन्हा एकदा सज्ज होत भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.अण्णांच्या मोहिमेला ‘आयएसी’ पुर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन देखील पाटील यांनी यानिमित्ताने दिले.

दिल्लीत लोकपाल आंदोलनानंतर अण्णा अनपेक्षितरीत्या प्रकाशझोतातून बाहेर पडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून अण्णांनी कुठलेही आंदोलन केले नाही.’भ्रष्टाचार स्वच्छता’ मोहिम आता अण्णांनी हाती घ्यावी, असे पाटील म्हणाले. राज्यातील लोकप्रतिनिधी आमदार-खासदार, सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, सुपर क्लास १, अ,ब श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ होत आहे. अशा अधिकाऱ्यांच्या संपत्तीच्या स्त्रोताचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. भ्रष्टाचारमुक्तीसाठी त्यामुळे अण्णा यांनी पुढाकार घ्यावा, असे पाटील म्हणाले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर डाक विभागामार्फत जिल्ह्यात 1 मे पासून “ज्ञान पोस्ट” सेवा सुरु

कोल्हापूर डाक विभागामार्फत जिल्ह्यात 1 मे पासून “ज्ञान पोस्ट” सेवा सुरु  …