
no images were found
अभिनेत्रींनी उन्हाळ्यामध्ये त्यांच्या मेकअपसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांबाबत सांगितले
उन्हाळा विशेषत: कडाक्याच्या ऊनामध्ये व उच्च तापमानामध्ये बाहेर शूटिंग करताना घातक ठरू शकतो. घाम, आर्द्रता आणि दीर्घकाळपर्यंत शूटिंगमुळे मेकअप कायम ठेवणे आव्हानात्मक ठरू शकते. एण्ड टीव्हीवरील अभिनेत्री स्मिता साबळे (धनिया, ‘भीमा’), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’) उन्हाळ्यामध्ये मेकअपचे संरक्षण करण्याच्या टिप्सबाबत सांगत आहेत, ज्यामुळे त्यांना दिवसभर फ्रेश व कॅमेऱ्यासमोर उत्साहीपणे सुसज्ज राहण्यास मदत होते. मालिका ‘भीमा’मध्ये धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्हणाल्या, ”माझी भूमिका धनियासाठी मेकअप अत्यंत नैसर्गिक व साधा आहे, ज्यामध्ये अर्थी टोन्स आणि कोमल, नो-मेकअप लुक आहे, जे तिच्या समकालीन व विनम्र व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहे. मेकअपसंदर्भात अतिरेक करण्यापेक्षा नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यावर अधिक भर दिला जातो, ज्याची मी प्रशंसा करते. पण उन्हाळ्यादरम्यान कडाक्याच्या ऊनामध्ये शूटिंग करण्यासाठी उत्तम स्किनकेअरची गरज असते. मी नेहमी वजनाने हलके, ऑइल-फ्री मॉइश्चराइजर व मॅटिफाइंग प्राइमरचा वापर करते, ज्यामधून कोमल व नॉन-ग्रीसी लुक प्राप्त करते. मी अधिक प्रमाणात फाऊंडेशनऐवजी टिंटेड मॉइश्चराइजर किंवा बीबी क्रीमचा वापर करते, जे चेहऱ्यावर मुरमं न आणता नैसर्गिक फिनिश देते. शूटिंगदरम्यान ब्लोटिंग पेपर्स माझे सर्वोत्तम सोबती आहेत, ते मेकअपचे नुकसान न करता अतिरिक्त ऑइल शोषून घेण्यास मदत करतात. मी प्रत्येकवेळी आकर्षक दिसण्यासाठी सेटिंग स्प्रेचा देखील वापर करते, ज्यामधून दीर्घकाळपर्यंत बाहेर शूटिंग करताना देखील माझा लुक सर्वोत्तम दिसण्याची खात्री मिळते.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्हणाल्या, ”माझा सर्वात मोठा समर मेकअप मंत्र म्हणजे त्वचेची योग्यरित्या काळजी घेणे. सुरूवातीला उन्हाळ्यामध्ये शूटिंगच्या वेळी मला मेकअपसंदर्भात संघर्ष करावा लागायचा, घाम व आर्द्रतेमुळे मेकअप निघून जायचा. मला आठवते, फ्रेश दिसण्यासाठी दिवसातून मी किमान वीस वेळा मेकअप करायचे. ते अत्यंत त्रासदायक व वेळ वाया घालवणारे होते आणि मला त्यावर सर्वोत्तम उपाय शोधण्याची गरज होती. आता, मी साध्या, पण गुणकारी नित्यक्रमाचे पालन करते, ज्यामुळे माझा मेकअप दीर्घकाळपर्यंत कायम राहतो. मी कोणत्याही उत्पादनांचा वापर करण्यापूर्वी कपड्यामध्ये बर्फाचे तुकडे ठेवून चेहऱ्यावरून फिरवते. यामुळे माझ्या त्वचेला थंडावा मिळतो, तसेच घाम देखील कमी येतो आणि मुरमं कमी होत दीर्घकाळपर्यंतच्या मेकअपसाठी उत्तम लुक मिळतो. माझी त्वचा तेलकट आहे, ज्यामुळे मी माझा चेहरा तेलकट करतील असे क्रीमी उत्पादने टाळते. त्याऐवजी, मी पावडर-आधारित ब्लश व ब्रोन्झरचा वापर करते, जे माझ्या चेहऱ्यावरील छिद्रांना बंद न करता कोमल, मॅट फिनिश देतात. डोळ्यांसाठी मी जेल-आधारित काजल व वॉटरप्रूफ मस्काराचा वापर करते, ज्यामुळे माझ्या डोळ्यांचा मेकअप डागांपासून सुरक्षित राहतो आणि प्रखर ऊनामध्ये दीर्घकाळपर्यंत शूटिंग केल्यानंतर देखील खराब होत नाही. आणखी एक युक्ती म्हणजे मी हायड्रेशनचे पालन करते. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या फ्रेश राहते आणि माझा मेकअप विस्कळीत किंवा खराब दिसण्याला प्रतिबंध होतो. या लहान, पण गुणकारी पावलांनी मोठा बदल घडवून आणला आहे आणि आता मला दिवसभरात क्वचितच पुन्हा मेकअप करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये ऊन प्रखर जाणवू शकते, पण योग्य ट्रिक्ससह मला मेकअप कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये अंगूरी भाबीची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय शुभांगी अत्रे म्हणाल्या, ”उन्हाळ्यामध्ये मेकअपसंदर्भात कमी उपाय अधिक लाभदायी असतात. सुरूवातीला मला खूप संघर्ष करावा लागायचा, दीर्घकाळपर्यंत शूटिंगदरम्यान माझी त्वचा घामाने भिजून जायची, ज्यामुळे माझा मेकअप विस्कळीत व खराब दिसायचा. मेकअपमध्ये कितीही टच-अप्स केले तरी उष्णतेमुळे तो खराब होऊन जायचा. माझे फाऊंडेशन निघून जायचे, आयलाइनर खराब व्हायचे कॅमेऱ्यासमोर माझी त्वचा तेलकट दिसायची, ज्यामुळे मी खूप अस्वस्थ्य होत होती. काळासह मी फाऊंडेशन, मस्करा किंवा आयलाइनर असो वॉटरप्रूफ उत्पादनांचा वापर करू लागले, कारण ते घाम शोषून घेतात आणि कडक ऊनामध्ये देखील मेकअप कायम ठेवण्यास मदत करतात. विशेषत: टी-झोन भोवती चमकण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सैल पारदर्शक पावडर माझ्या पसंतीची आहे, जी तेलकटपणावर नियंत्रण ठेवते. माझ्या ओठांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी मी ऊनामध्ये चिपचिपित वाटू शकणाऱ्या जाड लिपस्टिक्सऐवजी लाइटवेट लिप टिंट्सचा वापर करते. मी एक गोष्ट कधीच चुकवत नाही, ती म्हणजे गुलाबपाण्यासह फेशियल मिस्ट. मी नेहमी माझ्या बॅगेमध्ये ते ठेवते आणि स्प्राइट्झ माझ्या त्वचेला उत्साही ठेवते, व्यस्त शूटिंगदरम्यान देखील त्वचा कोमल व नैसर्गिक दिसते. या लहान समायोजनांनी उन्हाळ्यामध्ये मेकअपची काळजी घेण्यासंदर्भात माझ्या पद्धतींमध्ये पूर्णपणे बदल केला आहे, ज्यामुळे मला आता मेकअप निघून जाण्याबाबत चिंता करावी लागत नाही आणि माझी त्वचा दिवसभर फ्रेश, कोमल व कॅमेऱ्यासमोर आकर्षक दिसते.”