
no images were found
वसुधा’मध्ये कशाप्रकारे प्रतीक्षा राय करिष्माला जीवंत करत आहे !
झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ह्या मालिकेने प्रेक्षकांना आपल्या नाजूक आणि रोचक कथेसह आपल्या खुर्च्यांना खिळवून ठेवले आहे. वसुधा प्रिया ठाकूर आपल्या ह्या श्रद्धेवर विश्वास ठेवून राहते की देवांश अभिषेक शर्मा ने दिलेले मंगळसूत्र जर तिने परिधान करून ठेवले तर त्याच्या जीवाचे संरक्षण होईल, तेव्हा करिष्मा प्रतीक्षा राय तिच्यासोबत कट करण्याची संधी मिळवते. आपल्या व्यक्तिरेखा अचूक बनवण्यासाठी कलाकारांना अथक सराव करावा लागतो आणि अशीच एक समर्पित अभिनेत्री आहे प्रतीक्षा राय जी कटकारस्थानी आणि आकर्षक अशा करिष्माची भूमिका साकारत असून आपल्या बारकाईच्या परफॉर्मन्ससह वलये निर्माण करत आहे. तिची व्यक्तिरेखा वसुधासाठी अडथळे निर्माण करत असून इस्पितळात देवांश अभिषेक शर्मा ला इजा पोहोचवण्याच्या करिष्माच्या प्रयत्नाचे अगदी उत्तम चित्रण प्रतीक्षाने केले आहे.
वरकरणी निरागसपणाचा आव आणत करिष्मा लपूनछपून कारवाया करते, अफवा पसरवते आणि अस्थिरपणाचा फायदा उठवते आणि अर्थातच त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाते. आपली भूमिका अचूक बनवण्यासाठी प्रतीक्षाने आपल्या आवाजाच्या मॉड्युलेशन आणि संवादफेकीवर सक्रियपणे कार्य केले असून मालिकेच्या दिग्दर्शकांकडून मौल्यवान सल्ला घेत आपल्या सहकलाकारांचेही ऐकले आहे. आपल्या अभिनयामध्ये सखोलपणा आणत तिने बॉलीवूडमधील सर्वांत आयकॉनिक खलनायिका ऐतराजमधील प्रियांका चोप्राच्या शक्तीशाली व्यक्तिरेखेकडून प्रेरणा घेतली आहे.
आपल्या व्यक्तिरेखेबद्दल प्रतीक्षा राय म्हणाली, “करिष्माच्या व्यक्तिरेखेल्या अनेक स्तर असून तिच्या कृतीमागे तिचे खासगी हेतू असून ती कधीही दुसऱ्यांच्या भावनेबद्दल विचार करत नाही. तिला साकारणे आव्हानात्मक आहे कारण ती आतून कटकारस्थानी असली तरी बाहेरून मात्र अतिशय आकर्षक आहे. आपल्या भूमिकेसाठी तयारी करण्यासाठी मी माझ्या आवाजाच्या मॉड्युलेशन आणि संवादफेकीवर सक्रियपणे कार्य केले असून ऐतराजमधील प्रियांका चोप्राच्या खलनायकी व्यक्तिरेखेकडून प्रेरणा घेतली आहे. वसुधाच्या सेटवरील माझ्या सहकलाकारांनी मला जे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आभारी आहे. ऑनस्क्रीन माझ्या व्यक्तिरेखेच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यामध्ये यामुळे मोठी मदत झाली आहे. तिच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहण्याचा अनुभव उत्तम शिकवण होती आणि वसुधाच्या विरोधातील करिष्माच्या कारवायांवर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
आगामी भागांमध्ये करिष्माच्या कारवाया अनपेक्षित वळण घेत असताना ‘वसुधा’मध्ये प्रेक्षक आणखी पकड घेणाऱ्या नाट्याची अपेक्षा करू शकतात. आता करिष्मा अधिकाधिक खतरनाक होत असताना काय ती वसुधाची फजिती करण्यात यशस्वी होईल की तिच्या योजना फसतील?