Home शासकीय अग्निशमन दल पदभरती आधीच ठरलं होतं का?- संजना घाडी

अग्निशमन दल पदभरती आधीच ठरलं होतं का?- संजना घाडी

5 second read
0
0
124

no images were found

अग्निशमन दल पदभरती आधीच ठरलं होतं का?- संजना घाडी

मुंबई : अग्निशमन दलाच्या महिला भरतीत प्रचंड गोंधळ उडाला. संतापलेल्या तरुणींनी मैदानातचं जोरदार आंदोलन केले. तरुणींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी तरुणींवर सौम्य लाठीमार केला. यामुळं येथील वातावरण चांगलेच तापले. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी  तिथं आल्या. यावेळी बोलताना संजना घाडी म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे मैदानावर २१० महिला पदासाठी अग्निशमन दलाची भरती सुरू आहे. प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. प्रशासन म्हणतं, ८ वाजतापूर्वी आलेल्या सर्व तरुणींना त्यांनी आत घेतलं. शिवाय १.६२ इंच उंची असलेल्या तरुणींना आतमध्ये घेतलं.

     नांदेड, लातूर येथून काही तरुणी आल्या आहेत. त्या कालपासून येथे राहायला आहेत. पण, गर्दीत काही तरुणींना शिरता आलं नाही. ही भरती दोन-तीन टप्प्यात का झाली नाही, असा सवाल संजना घाडी यांनी विचारला.ग्रामीण भागातून तरुणी आशेने आल्या आहेत. त्यांची या गर्दीत प्रतारणा झाली. रिजेक्टेटचे स्टँप असलेल्या तरुणींची उंची ही १.६२ इंचीच्या पुढे आहे. मग, यांना रिजेक्ट करण्याचं कारण काय. पायावर पाय मारून मान खाली करून त्यांची उंची मोजली जात असल्याचा आरोपी काही तरुणींनी केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…