no images were found
बायरकडून भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांना अत्याधुनिक कीड व्यवस्थापनाद्वारे मदत करण्यासाठी ट्रान्स सादर
भारत, – बायरने आज ‘ट्रान्स’ या नावीन्यपूर्ण कीटकनाशकाची बाजारातील प्रवेशाची घोषणा केली. हे कीटकनाशक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी अशा रस शोषणाऱ्या कीट समूहांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरेल. एकाच उत्पादा मध्ये दोन प्रभावी कार्यपद्धती एकत्र करून ‘ट्रान्स’ व्यापक नियंत्रण देते, ज्यामुळे पिकांचे आरोग्य सुधारते आणि पिकाची उत्पादकता व शेतकऱ्यांचा नफा वाढतो. हे उत्पादन जुलै २०२६ पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब आणि हरियाणा अशा प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये उपलब्ध होईल.
भारतातील कापूस लागवडीला एकाच वेळी अनेक रस शोषणाऱ्या किडींना सामोरे जावे लागते. कीटकामध्ये वाढणारी प्रतिकारशक्ती, अनेक प्रकारच्या कीटकांचा एकाच वेळी प्रादुर्भाव आणि कीट व्यवस्थापनासाठी मर्यादित उपायांमुळे पिकाला सतत वाढत्या दबावाला सामोरे जावे लागत आहे. या आव्हानांमुळे अनेकदा पिकांची वाढ खुंटते, उत्पन्न कमी होते आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो.
या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेले ‘ट्रान्स’ दोन प्रगत रसायनांना एकत्र आणते ज्यांची कार्यपद्धती एकमेकांना पूरक आहे. आधुनिक शेतीसाठी तयार केलेले ट्रान्स हे पिकामध्ये दुहेरी मार्ग प्रणाली आणि पर्णपटल-पार क्रियेने काम करते. ज्यामुळे विद्यमान पाने आणि नवीन येणारी पाने या दोन्हींचे संरक्षण शक्य होते. याचे पर्जन्य-प्रतिरोधक सूत्र, फवारणीनंतर दोन तासांनंतर होणाऱ्या पाऊसमूळे याच्या असरकारकते मध्ये काही बाधा आणत नाही. याच बरोबर एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये ‘ट्रान्स’ सहजपणे सामावू शकते ज्यामुळे अधिक शाश्वत पीक संरक्षण पद्धती शक्य होते.
प्रभावी कीड नियंत्रणापलीकडे जाऊन ‘ट्रान्स’ पिकाच्या निरोगी वाढीद्वारे पिकाचे आरोग्य जपण्यास मदत करते. हे कीटकांचे जलद अन्नग्रहण थांबवून, पाने अधिक स्वस्थ करते आणि वारंवार पीक संरक्षणाचा हस्तक्षेप कमी करून गुंतवणुकीवरील परतावा व उत्पादन क्षमताही सुधारते.
या उत्पादनाबाबत बोलताना बायरच्या क्रॉप सायन्स विभागाचे, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सी.ओ.ओ.) मोहन बाबू म्हणाले, “बायरमध्ये शेतकऱ्यांच्या बदलत्या आव्हानांना समजून घेऊन नवीन उत्पाद निर्मितीची सुरुवात होते. अनेक कीटकांचा एकत्र प्रादुर्भाव आणि वाढती प्रतिरोधक क्षमता यामुळे रस शोषणाऱ्या कीड समूहांचे व्यवस्थापन करणे अधिकाधिक कठीण झाले आहे. ट्रान्स दोन पूरक कार्यपद्धतींना एकाच नाविन्यपूर्ण उपायात एकत्र आणते. त्यातून प्रभावी आणि शाश्वत कीड व्यवस्थापन मिळते आणि शेतकऱ्यांना पिकाचे आरोग्य, उत्पादकता आणि नफा सुधारण्यास मदत करते.”
ट्रान्स बाजारात उपलब्ध करताना बायर आपले पीक संरक्षण उत्पाद संग्रह अधिक मजबूत करत आहे. कंपनी विज्ञानावर आधारित नवनिर्मिती सादर करत असून त्यातून शेतकऱ्यांना संसाधनांचे जतन करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांमध्ये पुढचे पाऊल टाकत आहे.ट्रान्स १०० मिली, २२० मिली आणि ५०० मिली पॅकमध्ये उपलब्ध असेल.