no images were found
शिवाजी विद्यापीठात लोकमान्य टिळक जयंती
कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठात आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. शशिकांत पंचगल्ले, डॉ. दादा ननवरे, दिपाली कोळी, प्रियांका निकम, यास्मिन मुल्ला, अनुजा घोरपडे, काजल कुंभारदरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.