Home संस्कृतिक महापालिकेच्यावतीने इंदिरा गांधी जयंती साजरी

महापालिकेच्यावतीने इंदिरा गांधी जयंती साजरी

7 second read
0
0
12

no images were found

महापालिकेच्यावतीने इंदिरा गांधी जयंती साजरी

कोल्हापूर  :- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाचे स्वातंत्र्य, एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी तसेच ती अधिक दृढ करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली.

          यावेळी मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, नगरसचिव दिवाकर कारंडे, अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, वरिष्ठ लेखापरीक्षक भीमराव डोणे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, विजय पाटील, मिलिंद कुंभार, सुनील गेजगे, रवी पोवार, इंद्रजित चौगुले, अमित सातारकर, विशाल चौगुले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयांना १२६. कोटी ३३ लाख रुपयांचे वितरण

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयांना १२६. कोटी ३३ लाख रुपयांचे वितरण : ऑक्टोबर महि…