no images were found
अदाणी एनर्जी सोल्युशन्सला बिहारमधील ट्रांसमिशन प्रकल्प मिळाला
संपादकांसाठी ठळक मुद्दे
- अदाणी पॉवरच्या आगामी पिरपैंती अल्ट्रा सुपर क्रिटिकल औष्णिक वीज प्रकल्पातून निर्माण होणारी 2,400 मेगावॅट वीज वाहून नेण्यासाठी आणि बिहारमधील वीज पारेषण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
- या प्रकल्पामुळे अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या ट्रांसमिशन पोर्टफोलिओमध्ये 881 सर्किट किलोमीटर (ckm) लांबीच्या वीज वाहिन्या आणि 3,160 MVA क्षमतेची वीज रूपांतर व्यवस्था जोडली जाणार आहे.
अहमदाबाद, : भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची पॉवर ट्रांसमिशन आणि वितरण कंपनी अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (AESL) ने बिहारमधील पीरपैंती येथे उभारण्यात येणाऱ्या 2,400 मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पातून वीज वाहून नेण्यासाठीचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळवल्याची आज घोषणा केली. टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग (TBCB) प्रक्रियेद्वारे हा प्रकल्प मिळवण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर कंपनीला दरवर्षी सुमारे 500 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
“3X800 मेगावॅट एसटीपीपी पीरपैंती प्रकल्पातून वीज वाहून नेणे” असे या प्रकल्पाचे नाव आहे. हा प्रकल्प विक्रमशिला पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड या विशेष उद्देश कंपनीमार्फत (SPV) राबवण्यात येणार आहे. 2028 च्या शेवटच्या तिमाहीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. पीरपैंती वीज प्रकल्पातून वीज वाहून नेण्यासोबतच, या प्रकल्पामुळे बिहारमधील ट्रान्समिशन व्यवस्था अधिक मजबूत होईल आणि वीजपुरवठ्याची विश्वासार्हता वाढेल.
अदाणी एनर्जी सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कंदर्प पटेल म्हणाले, “पीरपैंती ट्रान्समिशन प्रकल्पामुळे 2,400 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या प्रकल्पातून वीज वाहून नेण्यासाठी मजबूत व्यवस्था तयार होईल. तसेच बिहारमधील ट्रान्समिशन व्यवस्था अधिक मजबूत होईल. यामुळे वीज ग्रीडची विश्वासार्हता आणि क्षमता वाढेल. राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासही मदत होईल. देशाच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेला हातभार लावणारी विश्वासार्ह आणि कार्यक्षम ट्रान्समिशन यंत्रणा उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,”
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या (AESL) ट्रान्समिशन पोर्टफोलिओमध्ये 881 सर्किट किलोमीटर (ckm) लांबीच्या ट्रान्समिशन लाईन्स आणि 3,160 MVA क्षमतेची वीज रूपांतरण यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळे कंपनीच्या एकूण ट्रान्समिशन लाईन्सची लांबी 30,683 सर्किट किलोमीटर आणि वीज रूपांतरण क्षमता 1,46,585 MVA होईल. या प्रकल्पामुळे अदानी एनर्जी सोल्युशन्सची ट्रान्समिशन क्षेत्रातील एकूण भांडवली गुंतवणूक आता सुमारे 91,500 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
या प्रकल्पांतर्गत झंझारपूर, बेथौली आणि बेगुसराय येथे चार गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन्स (GIS) उभारण्यात येणार आहेत. तसेच त्यासाठी आवश्यक वीज रूपांतरण क्षमताही निर्माण केली जाणार आहे. या प्रकल्पात 400 केव्ही क्षमतेच्या पीरपैंती-झंझारपूर, पीरपैंती-बेगुसराय आणि बेगुसराय-बख्तियारपूर ट्रान्समिशन लाईन्स उभारण्यात येणार आहेत. याशिवाय 220 केव्ही क्षमतेच्या झंझारपूर-बेथौली आणि बेगुसराय-बेगुसराय टाउन ट्रान्समिशन लाईन्स उभारल्या जाणार आहेत. याशिवाय, झंझारपूर येथे सध्या अस्तित्वात असलेल्या 220 केव्ही आणि 132 केव्ही वीजवाहिन्यांना नवीन जोडणी देण्यात येणार आहे. तसेच बख्तियारपूर ग्रिड सबस्टेशन (जीएसएस) येथे 400 केव्ही वीजवाहिन्यांसाठी आवश्यक बे तयार करण्यात येणार आहेत.